शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २३ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
2
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
3
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
4
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
5
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
6
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
7
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
8
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
9
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
10
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
11
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
12
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
13
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
14
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
15
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
16
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
17
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
18
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
19
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
20
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Festival -जिल्ह्यात १३३ गावांत गणेशोत्सवच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:23 IST

देशासह राज्यावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना कोल्हापूर जिल्ह्यात १३३ गावांनी उद्या, शनिवारपासून सुरू होणारा सार्वजनिक गणेशोत्सव सणच साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तर सुमारे ३६७ गावांनी एक गाव, एक गणपती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर पोलीस दलातर्फे केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील गावांनी प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे जी गावे हा उत्सव करणार नाहीत ती गावे हाच खर्च कोरोना रुग्णांवर करणार आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात १३३ गावांत गणेशोत्सवच नाही जिल्ह्यात ५२८९ सार्वजनिक ठिकाणी गणपती प्रतिष्ठापना

तानाजी पोवारकोल्हापूर : देशासह राज्यावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना कोल्हापूर जिल्ह्यात १३३ गावांनी उद्या, शनिवारपासून सुरू होणारा सार्वजनिक गणेशोत्सव सणच साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तर सुमारे ३६७ गावांनी एक गाव, एक गणपती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर पोलीस दलातर्फे केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील गावांनी प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे जी गावे हा उत्सव करणार नाहीत ती गावे हाच खर्च कोरोना रुग्णांवर करणार आहेत.कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली असताना अशा परिस्थितीत गावांनी उत्सवावरील अनाठायी खर्च हा कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी करावा म्हणजेच खरा उत्सव साजरा केल्याचे समाधान मिळेल असे आवाहन कोल्हापूर पोलीस दलातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकडॉ. अभिजित देशमुख यांनी केले होते. त्या आवाहनाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्या, शनिवारी गणेश चतुर्दशीदिवशी गणरायाची प्रतिष्ठापना होत आहे, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तब्बल १३३ गावांनी हा सण साजरा न करता सामाजिक कार्यावर खर्च करण्याचा निर्णय हा राज्याच्या दृष्टीने आदर्श ठरला आहे.

जिल्ह्यातील १०३० पैकी ३६७ गावांनी ह्यएक गाव, एक गणपतीह्ण तोही साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला शिवाय जिल्ह्यात एकूण ५२८९ ठिकाणी सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठाना करण्यात येणार आहे.१) गणेशोत्सव साजरा न करणारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावे व मंडळांची संख्या :नेसरी - २१, कोडोली - १९, इस्पुर्ली - १९, भुदरगड - १५, कागल - १३, करवीर - ०६, मुरगूड - ०८, पन्हाळा - ०३, राधानगरी - ०९, हातकणंगले - ०३, गडहिंग्लज - ०८, आजरा - ०९,२) एक गाव एक गणपती उपक्रम करणारी प्रमुख पोलीस ठाणे हद्दीतील गावे संख्या :करवीर - ४६, चंदगड - ६१, आजरा - ४५, राधानगरी - ३२, गडहिंग्लज - ३१, शाहूवाडी - २२, कळे - २५, कागल - १०, शिरोली एमआयडीसी - १२, मुरगूड - १४, गोकुळ शिरगाव - १२, गगनबावडा - १३, कुरुंदवाड - १०, भुदरगड - १२, पन्हाळा - ०९, कोडीली - ०२, शिवाजीनगर (इचलकरंजी) - ०२, वडगाव - ०१, हातकणंगले - ०६, शिरोळ - ०२.कोरोनावर होणार खर्चगणेशोत्सव साजरा न करणाऱ्या व ह्यएक गाव, एक गणपतीह्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींनी या उत्सवावरील खर्च हा कोरोना महामारीचा निपटारा करण्यासाठी आपापल्या गावात सामाजिक उपक्रमासाठी करणार आहेत. त्यासाठी कोरोनाग्रस्त रुग्णांच्यासाठी विवीध सुविधा उपलब्ध करून देण्याचा पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.शहरातील वीस मंडळांचा २१ फुटीला फाटादरवर्षी लाखो रुपये खर्च करणाऱ्या कोल्हापूर शहरातील २१ फुटी उंच गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करणाऱ्या २० गणेशोत्सव मंडळांनी उत्सवात यंदा भव्य, दिव्यता न करता छोटी मूर्ती बसवणार, उत्सवावरील खर्च हा कोरोना हटविण्याच्या प्रशासनाच्या उपक्रमावर खर्च करणार असल्याचे पत्र पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिले आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर