शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Festival -राजारामपुरीत यंदाही डॉल्बीला फाटा,साध्या पद्धतीने गणेशमूर्तीचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 19:39 IST

कोल्हापूर शहरामध्ये गणेशोत्सवामध्ये राजारामपुरी परिसरातील गणेशाच्या आगमनाची मिरवणूक सर्वाधिक लक्षवेधी असते. नेत्रदीपक रोषणाई पाहण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित असते. यंदा मात्र, कोरोनामुळे पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला राजारामपुरीच्या परिसरातील मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी गणेश आगमन अत्यंत साध्या पद्धतीने केले. परिणामी यंदाही राजारामपुरीत डॉल्बीला फाटा बसला.

ठळक मुद्देराजारामपुरीत यंदाही डॉल्बीला फाटा,साध्या पद्धतीने गणेशमूर्तीचे आगमनकोरोनामुळे नेत्रदीपक रोषणाईची परंपरा खंडित

कोल्हापूर : शहरामध्ये गणेशोत्सवामध्ये राजारामपुरी परिसरातील गणेशाच्या आगमनाची मिरवणूक सर्वाधिक लक्षवेधी असते. नेत्रदीपक रोषणाई पाहण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित असते. यंदा मात्र, कोरोनामुळे पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला राजारामपुरीच्या परिसरातील मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी गणेश आगमन अत्यंत साध्या पद्धतीने केले. परिणामी यंदाही राजारामपुरीत डॉल्बीला फाटा बसला.कोल्हापूर शहरामध्ये सार्वजनिक गणेश आगमनाची मिरवणूक राजारामपुरीत आणि विसर्जन मिरवणूक महाद्वार रोडवर अशी खासियत आहे. यामुळे शहरातील सर्व मंडळांचे राजारामपुरी येथील गणेश आगमन मिरवणुकीकडे दरवर्षी लक्ष लागून राहिलेले असते. येथील देखावे पाहण्यासाठीही पहाटेपर्यंत गर्दी होते. मागील वर्षी पोलीस प्रशासनाने डॉल्बीला कडाडून विरोध केला. यामुळे पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्येच गणेशाचे आगमन झाले.यंदाच्या वर्षी मंडळांनी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सवाचे नियोजन केले होते. मात्र, मार्चपासून कोरोनाचे संकट आल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी गणेश आगमनाची मिरवणूक काढू नये, अशा सूचना पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने शहरातील मंडळांना केल्या. यानुसार राजारामपुरी परिसरातील मंडळांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शहरामध्ये सर्वाधिक रुग्ण राजारामपुरी परिसरात असल्याने मंडळांनी साध्या पद्धतीनेच उत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यातही येणार आहेत. यानुसार शनिवारी येथील मंडळांनी गणेश आगमन साध्या पद्धतीने केले. बहुतांश मंडळांनी कोणत्याही वाद्याचा वापर न करता ह्यगणपती बाप्पा मोरयाह्णच्या गजरामध्ये मूर्ती आणली. मंडपाजवळ मूर्ती आणल्यानंतर केवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.राजारामपुरी चौक शांतदरवर्षी जनता बाजार येथील राजारामपुरी चौकात गणेशमूर्ती आगमनावेळी मंडळांनी केलेली विद्युत रोषणाई पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असते. यंदा कोरोनाच्या सावटामुळे दरवर्षीच्या तुलनेत चौक शांत आढळून आला. येथे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. काही मंडळांनी आदल्या दिवशीच मूर्ती आणल्या. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण