शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तेलनाडे बंधूंसह पाच जणांवर बलात्काराचा गुन्हा : एकजण ताब्यात; वीस वर्षे अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:21 IST

इचलकरंजी : येथील एका महिलेला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची व मुलीला वाममार्गाला लावण्याची धमकी देत विविध ठिकाणी नेऊन वीस वर्षे ...

ठळक मुद्देचौघांनी घरात घुसून जबरदस्ती केली व पूजेसाठी टेबलवर ठेवलेले चार ग्रॅम वजनाची कर्णफुले, एक तोळ्याचे मंगळसूत्र, सोन्या-चांदीची अंगठी असे ५० हजार रुपयांचे दागिने घेऊन सरकार सांगतील त्याठिकाणी यायचं, अशी धमकी देत निघून गेले

इचलकरंजी : येथील एका महिलेला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची व मुलीला वाममार्गाला लावण्याची धमकी देत विविध ठिकाणी नेऊन वीस वर्षे वेळोवेळी बलात्कार केला, तर एकवेळ तिघांनी सामूहिक बलात्कार केला. तसेच ५० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिनेही जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी नगरसेवक संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, अ‍ॅड. पवन उपाध्ये, प्रशांत होगाडे यांच्यासह पाचजणांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजताच शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील मुख्य पोस्ट आॅफिससमोर पोवार गल्लीमध्ये राहणाऱ्या प्रशांत होगाडे याने परिसरातील महिलेला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची व ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेचा विवाह झाल्यानंतरही त्याने तिच्या पतीला संबंधित महिला चारित्र्यहिन असल्याचे सांगून त्या पती-पत्नीमध्ये वाद निर्माण केला. त्यानंतर डिसेंबर २००८ ते मार्च २०१९ पर्यंत संजय तेलनाडे याच्या नावाची धमकी देत वारंवार बलात्कार केला.जानेवारी २००९ मध्ये संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, पवन उपाध्ये व ड्रायव्हर सादीक मुजावर यांनी संबंधित पीडित महिलेला जबरदस्तीने गाडीत घालून कोल्हापूर नाका परिसरातील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी फिर्यादीने जोरदार आरडाओरडा केल्याने सर्वजण पळून गेले. त्यानंतर मार्च २०१७ मध्ये आवाडे अपार्टमेंटच्या पाठीमागे असलेल्या महेश ऊर्फ सनी मेहता याच्या घरी पीडित महिला वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. त्याठिकाणी तेलनाडे बंधूंसह अ‍ॅड. उपाध्ये यांनी तिला खोलीत नेऊन आळीपाळीने बलात्कार केला. याबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.त्यानंतर आॅक्टोबर २०१८ मध्ये दिवाळी -लक्ष्मी पूजनादिवशी प्रशांत, संजय, सुनील व पवन या चौघांनी घरात घुसून जबरदस्ती केली व पूजेसाठी टेबलवर ठेवलेले चार ग्रॅम वजनाची कर्णफुले, एक तोळ्याचे मंगळसूत्र, सोन्या-चांदीची अंगठी असे ५० हजार रुपयांचे दागिने घेऊन सरकार सांगतील त्याठिकाणी यायचं, अशी धमकी देत निघून गेले असल्याचे संबंधित पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

तेलनाडे टोळीवर चौथा गुन्हा दाखलनगरसेवक संजय तेलनाडे याच्यावर कोल्हापुरात मटकाप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्याच्या टोळीवर शहापूर पोलीस ठाणे, शिवाजीनगर पोलीस ठाणे व गावभाग पोलीस ठाणे या तीन ठिकाणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हा बलात्काराचा चौथा गुन्हा गावभाग पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. एकूण संजय याच्यावर पाच व टोळीवर चार गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर