शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सापळा रचून हस्तीदंत विकणाऱ्या टोळीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 21:48 IST

Crime News Kolhapur- कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीनफील्डजवळ हस्तीदंत विकणाऱ्या टोळीला कोल्हापूर वनपरिक्षेत्राच्या फिरत्या पथकाने बुधवारी सापळा रचून अटक केली. याप्रकरणी तीनजणांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडील मोटार, दुचाकी, मोबाईलसह ९६५ ग्रॅम वजनाचे तीन हस्तीदंत जप्त केले आहेत.

ठळक मुद्देसापळा रचून हस्तीदंत विकणाऱ्या टोळीस अटकतीन हस्तीदंत जप्त, वन विभागाची कारवाई

कोल्हापूर :कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीनफील्डजवळ हस्तीदंत विकणाऱ्या टोळीला कोल्हापूर वनपरिक्षेत्राच्या फिरत्या पथकाने बुधवारी सापळा रचून अटक केली. याप्रकरणी तीनजणांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडील मोटार, दुचाकी, मोबाईलसह ९६५ ग्रॅम वजनाचे तीन हस्तीदंत जप्त केले आहेत.कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीनफील्डजवळ माणिक विलासराव इनामदार ( वय ५९, रा. परळी निनाई, ता. शाहूवाडी), सागर आबासाहेब साबळे (वय ३२, रा. माले, ता पन्हाळा), धनंजय केरबा जगदाळे (वय २१, रा. शिंगणापूर, ता करवीर) हे हस्तीदंत विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती कोल्हापूर वनपरिक्षेत्राच्या फिरत्या पथकाला समजताच त्यांनी सापळा रचून या टोळीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोटार, दुचाकी, तीन मोबाईलसह ९६५ ग्रॅम वजनाचे तीन हस्तीदंत जप्त केले आहेत.कोल्हापूर वनपरिक्षेत्राच्या फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील, साताऱ्याचे सचिन डोंबळे, वन्यजीव अपराध नियंत्रण सदस्य, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सापळा रचून या आरोपींना अटक केली.

बेकायदा पोपट बाळगल्याप्रकरणी कारवाई

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील आरकेनगर परिसरात बेकायदा पोपट बाळगल्याप्रकरणी वन्यजीव विभागाने कारवाई केली असून दोन पोपट ताब्यात घेतले आहेत.येथील आरकेनगर परिसरात एका व्यक्तीने दोन पोपट बाळगल्याची माहिती वन विभागाला मिळाली. १९७२ च्या वन्यजीव कायद्यानुसार शेड्यूल्ड ४ प्रकारातील वन्यजीव बाळगण्यास बंदी असल्यामुळे वनविभागाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून सुमारे २५ हजार रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. असे वन्यजीव बाळगू नका असे आवाहन कोल्हापूर वन विभागाचे करवीर परिक्षेत्राचे वनअधिकारी सुधीर सोनवले यांनी केले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर