शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Ganeshotsav : लगबग गणेशोत्सवाची : कोल्हापूरात मांडव उभारणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 11:37 IST

गेल्या वर्षभरापासून आपण ज्या लाडक्या गणरायांच्या आगमनाची वाट पाहतो आहोत, त्या बाप्पांच्या स्वागताला आता अवघे पंधरा दिवस उरले आहेत. यानिमित्त शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून, तरुण मंडळांच्या वतीने मांडवांची उभारणी केली जात आहे.

ठळक मुद्देलगबग गणेशोत्सवाची :वर्गणीचे संकलन कोल्हापूरात मांडव उभारणीला सुरुवात

कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून आपण ज्या लाडक्या गणरायांच्या आगमनाची वाट पाहतो आहोत, त्या बाप्पांच्या स्वागताला आता अवघे पंधरा दिवस उरले आहेत. यानिमित्त शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून, तरुण मंडळांच्या वतीने मांडवांची उभारणी केली जात आहे.सध्या श्रावण सुरू आहे. तो सरला की भाद्रपदमध्ये गणेशोत्सव सुरू होतो. यंदा १३ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी आहे. गणेशोत्सवाला आता काही दिवस उरल्याने एकीकडे श्रावणातील व्रतवैकल्ये, तर दुसरीकडे गणेशोत्सवाची प्राथमिक तयारी असे चित्र आहे. विशेषत: मंडळांकडून आता सार्वजनिक गणेशोत्सवासाठी लगबग सुरू आहे. शहरातील नामांकित तरुण मंडळांकडून मांडवांची उभारणी सुरू झाली आहे.शिवाजी चौक तरुण मंडळाचा महागणपती, शाहूपुरीतील राधाकृष्ण तरुण मंडळ, उमा टॉकीज परिसरातील पूलगल्ली तालीम मंडळ यांच्यासह शहरातील अनेक मोठ्या मंडळांकडून मांडवांची उभारणी सुरू झाली आहे. राधाकृष्ण तरुण मंडळाचा देशासह जगभरातील मंदिरे, काल्पनिक मंदिरे साकारण्यात हातखंडा आहे.

या मंडळाचा देखावा गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी खुला होतो. त्यामुळे मंडळाच्या वतीने मांडवात देखावा साकारला जात आहे. शिवाजी चौकातील महागणपतीची मूर्तीही दुसऱ्याच दिवशी दर्शनासाठी खुली केली जाते; त्यामुळे येथेही भव्य मांडव उभारला जात आहे. याशिवाय कोल्हापूर शहरासह उपनगरातील मंडळांच्या वतीने गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे.

वर्गणीचे संकलनएकीकडे मांडव उभारणीची तयारी सुरू असली तर दुसरीकडे मंडळांचे कार्यकर्ते वर्गणीचे संकलन करीत आहेत. गणेशोत्सव समितीची निवड, मंडळाची पावती पुस्तिका तयार करणे, उत्सवातील कामाचे वाटप, देखाव्यांचे नियोजन, रेकॉर्डिंग, तालमी, देखाव्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जोडणी, श्रींच्या पूजेसाठी वापरण्यात येणारे सोवळे, वस्त्र, हार, या ठेवणीतील वस्तूंची स्वच्छता अशी प्राथमिक कामे सध्या मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहेत.

 

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर