शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवानगी गणेश विसर्जन मिरवणूक काढली, जुना बुधवार पेठ तालीम गणेश मंडळावर गुन्हा दाखल

By उद्धव गोडसे | Updated: October 1, 2023 15:28 IST

ट्रॅक्टर चालक, ध्वनियंत्रणा मालकांवरही गुन्हा

कोल्हापूर : जुना बुधवार पेठ तालीम गणेश मंडळाने अनंत चतुर्दशीनंतर दुस-या दिवशी शहरातून विनापरवानी विसर्जन मिरवणूक काढून वाहतुकीला अडथळा केला. पोलिसांचा आदेश धुडकावून विनापरवानगी मिरवणूक काढणे आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याबद्दल मंडळाच्या पदाधिका-यांसह ट्रॅक्टर चालक, जनरेटरचे मालक, ध्वनियंत्रणेच्या मालकासह अनोळखी ४० ते ५० जणांवर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी देतानाच पोलिसांनी नियम व अटींचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अनंत चतुर्दशीलाच मंडळांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करणे आवश्यक होते. मात्र, जुना बुधवार पेठ तालीम गणेश मंडळाने पोलिसांचा आदेश धुडकावून शनिवारी शहरातून मिरवणूक काढत मूर्तीचे विसर्जन केले. मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी घेतली नाही. वर्दळीच्या रस्त्यावर मिरवणूक काढून वाहतुकीला अडथळा केला. याबाबत जाब विचारणाऱ्या पोलिसांशी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली. मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर, लेसर किरणांचा वापर आणि आवाज मर्यादेचे उल्लंघन करणारी ध्वनियंत्रणा लावल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिसांनी मंडळाचे दहा पदाधिकारी, ट्रॅक्टरचालक, जनरेटरचे मालक, ध्वनियंत्रणेच्या मालकासह मंडळाचे समर्थक आणि अनोळखी ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल केला.

यांच्यावर गुन्हा दाखल

मंडळाचे पदाधिकारी केदार सुकुमार शिंदे, अक्षय संजय घाटगे, कल्पेश कृष्णात नाळे,जयशंकर धर्मेश नष्टे, तेजस ज्ञानेश्वर मोहिते, अजित मोहन मंडलिक, विनीत सुजित पाटील, ललित निशिकांत कराळ, प्रथमेश विजय लिमये, अमेय राकेश कांबळे (सर्व रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर), अनोळखी दोन ट्रॅक्टरचालक, जनरेटरचे मालक सुतार बंधू, ध्वनियंत्रणेचे मालक सागर गवळी (रा. मंगळवार पेठ), मंडळाचे समर्थक उदय भोसले, सुशांत महाडिक, माजी नगरसेवक दिगंबर फराकटे यांच्यासह मिरवणुकीत सहभागी झालेल्या ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर