शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Visarjan 2018 : कोल्हापूरात बाप्पांसह ‘कर्णकर्कश वाद्या’लाही निरोप, २३ तासांनी विसर्जन मिरवणुकीची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 12:24 IST

विचारांचा वारसा लाभलेल्या आणि सातत्याने नव्या बदलाच्या प्रक्रियेची कास धरणाऱ्या पुरोगामी ‘कोल्हापूर’ने रविवारी याच परंपरेतील मानदंडात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

ठळक मुद्देबाप्पांसह ‘कर्णकर्कश वाद्या’लाही निरोप, पारंपारिक वाद्यांचा गजर २३ तासांनी विसर्जन मिरवणुकीची सांगता

कोल्हापूर : विचारांचा वारसा लाभलेल्या आणि सातत्याने नव्या बदलाच्या प्रक्रियेची कास धरणाऱ्या पुरोगामी ‘कोल्हापूर’ने रविवारी याच परंपरेतील मानदंडात आणखी एक मानाचा तुरा खोवला. मोठ्या कर्णकर्कश आवाजाच्या यंत्रणेला यंदा शंभर टक्के फाटा देत गणेशोत्सवाचे पावित्र्य तर जपलेच शिवाय महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रदर्शन घडवत, पारंपारिक वाद्यांचा गजरात गणरायाला निरोप दिला.

भक्तीचा आणि उत्साहाचा रविवारी सकाळी नऊ वाजता सुरु झालेला हा जल्लोष सोमवारी सकाळी आठ वाजता म्हणजे अखंडपणे २३ तासांनी संपला. सकाळी मिरवणुकीच्या सुरवातीस महापौर शोभा बोंद्रे यांना झालेली धक्काबुक्की तसेच गणपती पुढे घेण्यावरुन मंगळवार पेठेतील प्रॅक्टीस क्लब व पोलिसांमध्ये झालेला गैरसमज आणि त्यातून कार्यकर्त्यांवर झालेला लाठीमार वगळता संपूर्ण मिरवणुकीत कोठेही खुट्ट झाले नाही. या लाठीमारात मंडळाचे १३ कार्यकर्ते जखमी झाले.कोल्हापूर शहर आणि परिसरात गेल्या दहा दिवसापासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची सांगता रविवारी विसर्जन मिरवणुकीने झाली. सकाळी नऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी महापौर आर. के. पोवार, अ‍ॅड. धनंजय पठाडे, वसंत मुळीक, विजय देवणे, दिलीप देसाई, लाला गायकवाड, उदय गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आणि श्रींची आरती करुन मिरवणुकीला सुरवात झाली.

परंपरेनुसार मंगळवार पेठेतील तुकाराम माळी तालीम मंडळाला यंदाही मिरवणुकीत अग्रभागी राहण्याचा मान मिळाला. मंडळाची मूर्ती पालखीत ठेवण्यात आली होती. ही पालखी काही अंतर मान्यवरांनी वाहून नेली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या श्रीमंत प्रतिष्ठाणच्या ढोल ताशा पथकाने वातावरणात जल्लोष निर्माण केला. हा जल्लोष पुढे सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत अखंडपणे टिकून राहिला.मिरवणुकीला प्रारंभ होण्याआधीच शहरातील अनेक मंडळांनी आपल्या मूर्ती परस्पर विसर्जनाकरीता पंचगंगा नदी घाट तसेच इराणी खण येथे नेल्या. सकाळी लवकर बाहेर पडून विसर्जन करण्याच्या हेतूने मंडळांचे कार्यकर्ते बाहेर पडल्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच सातत्य निर्माण झाले.

मिरवणुकीत कर्णकर्कश ध्वनी यंत्रणेला पूर्णपणे बगल देत सर्वच मंडळांनी प्रत्यक्ष कृतीतून डॉल्बीमुक्तीचा संदेश दिला. हालगी, ढोल - ताशे, झांज, बेंजो, धनगरी ढोल, बी ढबाक, बॅँड, सनई चौघडे अशा पारंपारिक वाद्यांचा गजर केला. अगदी मोजक्या मंडळांनी मिरवणुकीत कमी तिव्रतेचा स्टेरिओ लावल्याचे पहायला मिळाले. अनेक मंडळांनी तर त्याही पुढे जात केवळ टाळ्यांचा गजर करत मूर्ती विसर्जनासाठी नेली.|डॉल्बीला पर्याय म्हणून मोठ्या मंडळांनी लेसर शो, लाईटस् इफेक्ट आणले होते. त्याच्या सोबतील आॅक्रेस्ट्रा पथके होती. मिरवणुकीचे तेच मुख्य आकर्षण ठरले. मंगळवार पेठेतील प्रक्टीस क्लब - सुबराव गवळी तालीम, पाटाकडील तालीम, दिलबहार तालीम, बालगोपाल, शिवाजी पेठेतील वेताळ तालीम, खंडोबा तालीम, बीजीएम स्पोर्टस, झुंजार क्लब, हिंदवी स्पोर्टस्, दयावान, शहाजी तरुण मंडळ, उत्तरेश्वर पेठेतील वाघाची तालीम, जुना बुधवार तालीम, गुजरी मित्र मंडळ आदी मंडळांचा त्यामध्ये समावेश होता. तटाकडील तालीम मंडळाने मुंबई येथील कलापथक आणले होते. या पथकाने बहारदार लोकनृत्य सादर करुन कोल्हापूरकरांची मने जिंकली. शाहूपुरी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणलेला ‘हिंदवी स्वराज्याची शपथ’हा चित्ररथ लक्षवेधी ठरला.मोठे थर लावून रचलेल्या लाईट इफेक्टस् व लेसर शो आणणाऱ्या मंडळांचे गणपती पोलिसांनी लवकर मुख्य मिरवणुकीत येऊ दिले नाहीत. बिनखांबी गणेश मंदिर आणि तारावाई रोडवरील सरस्वती चित्रमंदिर येथे पोलिस व्हॅन आडव्या लावल्या होत्या. मिरवणुक न रेंगाळता ती लवकर पुढे सरकत रहावी हा हेतू पोलिसांचा होता. मात्र तरीही मिरजकर तिकटीकडून आलेल्या प्रॅक्टीस क्लब, पाटाकडील, दिलबहार तालीम तर खरी कॉर्नरकडून आलेल्या शहाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढे सरकण्यास बराच वेळ घेतल्यामुळे मिरवणुक रेंगाळली.

सायंकाळी सात नंतर मिरवणुक चांगलीच रेंगाळली. सायंकाळी सात ते रात्री साडे नऊ या वेळेत महाद्वार चौक ते पापाची तिकटी या मार्गावर एकही मंडळ नव्हते. त्यामुळे पोलिसांनी थोडा दबाब तंत्राचा अवलंब करत आधी शहाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुढे ढकलत नेले. त्यानंतर मिरवणुकीला गती प्राप्त झाली. ती सोमवारी पहाटेपर्यंत कायम राहिली.मुख्यमिरवणुकीचा सांगता सोमवारी सकाळी साडेसात वाजता मिरजकर तिकटी येथे झाली. त्याठिकाणी पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलिस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर, सुरज गुरव, आर. आर. पाटील यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीतील शेवटचा गणपती क्रांतीवीर भगतसिंह तरुण मंडळ विक्रमनगर यांनी पंचगंगा नदीत विसर्जीत केला.

 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनkolhapurकोल्हापूर