शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Visarjan 2018 : कोल्हापूरातील मिरवणुकीत युवती, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 16:32 IST

गणेशोत्सवात कोल्हापूरने एक वेगळी परंपरा जोपासली आहे. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत रविवारी युवती, महिला उर्त्स्फूतपणे सहभाग नोंदविला.

कोल्हापूर : गणेशोत्सवात कोल्हापूरने एक वेगळी परंपरा जोपासली आहे. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत रविवारी युवती, महिला उर्त्स्फूतपणे सहभाग नोंदविला. त्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर,  फुगडीचे फेर धरत, लेझीम खेळत उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला. 

खासबाग मैदान येथून सकाळी नऊ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यापूर्वीच विसर्जन मार्गावर मंडळांचे आगमन झाले होते. शहरासह उपनगरातील विविध मंडळांच्या माध्यमातून या महिला, युवती मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या. त्यातील काही युवती, महिलांनी कोल्हापुरी फेटा बांधला, काहींनी भगव्या, लाल अशा एका रंगाच्या, तर काहींनी नऊवारी साडी नेसली होती. काहींनी हातात भगवा ध्वज घेतला होता. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा गजर करत त्यांचा जल्लोष सुरू होता. काही महिलांनी फुगडीचे फेर धरत, लेझीम खेळून मिरवणुकीमध्ये रंग भरला.  

 ‘बाप्पा’समवेत सेल्फी

या मिरवणुकीत सहभागी झालेल्या आणि मिरवणूक पाहायला आलेल्या युवती, महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मिरवणूक मार्गावर अनेक युवती, महिलांनी  ‘बाप्पां’च्या मूर्तीसमवेत सेल्फी टिपून आनंद व्यक्त केला.

ढोलवादन पथकात सहभाग

मिरवणुकीतील विविध ढोलपथकांमध्ये युवतींचा सहभाग लक्षणीय होता. पांढरा कुर्ता, भगवे जाकीट आणि कोल्हापुरी फेटा असा पेहराव  केलेल्या युवती मोठ्या उत्साहाने ढोलवादन करीत होत्या.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनkolhapurकोल्हापूर