शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018 : विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिका यंत्रणा सज्ज, नदीत मूर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:34 IST

कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने महानगरपालिका प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेश विसर्जन सोहळा व्यवस्थित पार पडण्याकरिता ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागत होत्या, त्यांची पूर्तता झाली आहे.

ठळक मुद्देविसर्जनासाठी महापालिका यंत्रणा सज्जपंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन

कोल्हापूर : शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने महानगरपालिका प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेश विसर्जन सोहळा व्यवस्थित पार पडण्याकरिता ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागत होत्या, त्यांची पूर्तता झाली आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांसह सुमारे ४०० कर्मचारी आवश्यक त्या यंत्रांसह विसर्जनाच्या प्रक्रियेत मंडळाच्या कार्यकर्त्यांना मदत करणार आहेत. दरम्यान, गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये न करता इराणी खणीमध्ये करावे; तसेच विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध व डॉल्बीमुक्त करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. रविवारी निघणाऱ्या विसर्जन मिरवणूक मार्गावरील सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे. निश्चित केलेल्या विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबूची व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेट्स व वॉच टॉवर उभी करण्यात आली आहेत. ड्रेनेज लाईनमधील अडचणी दूर करण्यात येत आहे. विसर्जन मार्गावरील सर्व अडथळे व अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. मिरवणूक मार्गावरील अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या फांद्याही छाटण्यात आलेल्या आहेत.मिरवणूक मार्ग व विसर्जनाच्या ठिकाणी प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे.

पंचगंगा नदीघाट, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, पंचगंगा नदी बापट कॅम्प येथे दान करण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती ठेवण्यासाठी मंडप उभारण्यात आलेला आहे. इराणी खणीवर सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी दोन जे. सी. बी. यंत्रांची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहेत. तसेच इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरिकेटिंग करण्यात आले असून, वॉच टॉवर व पोलीस पेंडल उभे करण्यात आलेले आहेत. मिरवणूक मार्ग व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका