-फोटो क्रमांक -१६०५२०२१-कोल-गांधी मैदान०१
ओळ - हेच ते ऐतिहासिक कोल्हापूर शहरातील गांधी मैदान. मागच्या आठवड्यात वळवाचा मोठा पाऊस झाला आणि या मैदानावर दलदल निर्माण झाली. चिखल, घनकचरा, गवत यामध्ये मैदान हरवून गेले आहे. सध्या कुजलेल्या पाण्यामुळे मैदानाची दुर्गंधी पसरली असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
फोटो क्रमांक -१६०५२०२१-कोल-गांधी मैदान०२
ओळ - दौलतराव भोसले विद्यालयाकडील बाजूने मैदानावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.
फोटो क्रमांक -१६०५२०२१-कोल-गांधी मैदान०३
ओळ - मैदानाच्या पूर्व व उत्तर बाजूने उभारण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड निखळले आहेत.
फोटो क्रमांक -१६०५२०२१-कोल-गांधी मैदान०४
ओळ - गांधी मैदानावर बसण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या करण्यात आल्या असल्या तरी त्या गवतात वेढल्या गेल्या असून बऱ्याच ठिकाणी त्या तुटलेल्या दिसतात.
- फोटो क्रमांक -१६०५२०२१-कोल-गांधी मैदान०५
ओळ - गांधी मैदानाचा परिसर म्हणजे गांजा ओढणाऱ्यांचा तसेच मद्यपींचा अड्डा बनला आहे. अनेक जण तेथेच बाटल्या टाकून जातात. सोमवारी या परिसरात अर्धी ट्रॉली भरेल एवढ्या बाटल्या उचलण्यात आल्या.