शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

१० कोटी हडपण्याची ‘गेम’ फसली

By admin | Updated: July 14, 2015 01:14 IST

महापालिका सभा : मालकीचा वाद असल्याने रमणमळा व टाकाळ्यातील आरक्षित जागा खरेदीचे ठराव मागे; प्रशासनाची खाबूगिरी उघड

कोल्हापूर : टाकाळा व रमणमळ्यातील शाळेसाठी आरक्षित जागा नगररचना कायद्याचा आधार घेत महापालिकेच्या गळ्यात मारण्याचा डाव सोमवारी प्रशासनाच्या अंगलट आला. टाकाळा येथील जागेची नोटीस देणाऱ्याची मालकीच न्यायालयाने रद्दबातल केली आहे, तर रमणमळ्यातील जागेचे पैसे मागणारा त्या जागेचा मालकच नाही, हे नगरसेवकांनी पुराव्यानिशी सभागृहात सिद्ध केले. आयुक्त पी. शिवशंकर यांनी या दोन्ही प्रकरणांची सुनावणी घेऊन फेरप्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, हे दोन्ही ठराव मागे घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर आक्रमक नगरसेवक शांत झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे होत्या. दरम्यान, महापालिकेला दहा कोटी रुपयांचा गंडा घालण्याच्या या प्रकरणात नगररचना सहसंचालक धनंजय खोत तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे खोत यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी जोरदार मागणी सभागृहाने केली. टाकाळा येथील रि.स.नं. ३८२/३ (अ) या शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेची कर्नल मंडलिक यांची मालकी न्यायालयाने रद्दबातल केली आहे. याबाबत अजय कोराणे व वीरेंद्र पवार यांनी महापालिकेकडे एक महिन्यापूर्वी तक्रार करूनही प्रशासन एकतर्फी घाई करीत आहे. ही सर्व माहिती सभागृहापासून लपवून का ठेवली? प्रशासनाच्या हेतूबाबत संशय असल्याचा गंभीर आरोप प्रा. जयंत पाटील यांनी केला. या जागेचा सात-बारा असल्याने खरेदी प्रस्ताव सादर केल्याचे सहसंचालक नगररचना धनंजय खोत यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी कळंबा टीडीआरप्रकरणी महसूूल विभागाच्या चुकीमुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. तलाठी मोठा की न्यायालय, असा सवाल प्रा. पाटील यांनी उपस्थित केला. याच प्रश्नावर राजेश लाटकर व शारंगधर देशमुख, भूपाल शेटे हे प्रशासनावर अक्षरश: तुटून पडले. ठराव मागे घेतल्याशिवाय पुढील कामकाज होणार नाही, असा दम नगरसेवकांनी दिल्यानंतर प्रशासनाने ठराव मागे घेत असल्याचे सांगितले. रमणमळा येथील ९०५/१ पैकी ३४३३.६७ चौरस मीटर शाळेसाठी आरक्षित जागा खरेदी करण्याच्या दुसऱ्या वादग्रस्त प्रस्तावावरही प्रशासन तोंडावर पडले. एका बांधकाम व्यावसायिकाने या जागेवर एका बँकेचा ७५ लाख रुपयांचा बोजा असताना, शेजारील जागेच्या वटमुखत्याराचा आधार घेत शेजारील रिकाम्या जागेवर हक्क सांगत महापालिकेला जागेच्या खरेदीची नोटीस पाठविली. उपशहर अभियंंता रमेश मस्कर यांनी जागेच्या मालकीबाबत शंका असल्याने प्रत्यक्ष मोजणी करून नकाशा सादर केल्याखेरीज खरेदी नोटीस लागूू करून घेऊ नये, असा शेरा मारला. मात्र, चारच दिवसांत धनंजय खोत यांनी दहा वर्षांच्या पूर्वीचा मोजणी नकाशा जोडून नोटीस लागू क रून घेतली. या दोन्ही प्रकारांत तब्बल १० कोटी रुपयांचा ढपला पाडण्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी खोत यांची चौकशी करण्याची मागणी भूपाल शेटे यांनी केली. राजेश लाटकर यांनी नगरभूमापन कार्यालयाने या जागेची मोजणी झाली नसल्याचा लेखी पुरावाच सादर केला. याप्रकरणी आयुक्तांना मध्यस्थी करीत हा प्रस्ताव मागे घ्यावा लागला. सभेपूर्वीच ई वॉर्डातील रि.स.नं. ५४६ येथील बगीच्याचा हिरव्या पट्ट्यातून रहिवाशी पट्ट्यात बदल करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला. ९० दिवसांचा आधार घेत प्रशासनाने या वादग्रस्तप्रकरणी परस्पर निर्णय घेतल्यास आयुक्त पी. शिवशंकर व नगररचनाचे धनंजय खोत यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा सभागृहाने दिला. (प्रतिनिधी)