शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

प्रधानमंत्री आवास योजनेत 'या' तालुक्याने मारली बाजी, राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 12:10 IST

राज्य पुरस्कृत आवास योजनेत कागलने बाजी मारली असून, बहुमजली इमारती उभारण्यात कोल्हापूर जिल्हा अव्वल राहिला आहे.

कोल्हापूर : महाआवास अभियान २०२० - २१अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत गगनबावडा तालुक्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. राज्य पुरस्कृत आवास योजनेत कागलने बाजी मारली असून, बहुमजली इमारती उभारण्यात कोल्हापूर जिल्हा अव्वल राहिला आहे.प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम ठरला असून, धुळे दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकांवर राहिला. त्याचबरोबर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, रत्नागिरी जिल्हा व्दितीय क्रमांक आणि वर्धा जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे.

अभियान कालावधीत केलेल्या कामाच्या टक्केवारीच्या आधारे एकत्रित गुणांकन करुन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी महाआवास अभियान पुरस्कार जाहीर केले.सर्वोत्कृष्ट विभाग :प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण प्रथम :- कोकण, व्दितीय - नागपूर, तृतीय - नाशिक.

राज्य पुरस्कृत आवास योजना, प्रथम - कोकण, व्दितीय - नाशिक, तृतीय - पुणे.सर्वोत्कृष्ट जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण प्रथम :- गोंदिया, व्दितीय - धुळे, तृतीय - ठाणे.

राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम - अहमदनगर, व्दितीय - रत्नागिरी, तृतीय - वर्धा.सर्वोत्कृष्ट तालुके : प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण प्रथम - गोरेगाव (जि. गोंदिया), व्दितीय - गगनबावडा (जि. कोल्हापूर), तृतीय - अकोले (जि. अहमदनगर).

राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम - सडक अर्जुनी (जि. गोंदिया), व्दितीय - मुक्ताईनगर (जि. जळगाव), तृतीय - कागल (जि. कोल्हापूर).सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती : प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण प्रथम - नाव (जि. सातारा), व्दितीय - वाडोस (जि. सिंधुदुर्ग), तृतीय - तडेगाव (जि. गोंदिया).

राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम - अंबावडे (जि. पुणे), व्दितीय - अणाव (जि. सिंधुदुर्ग), तृतीय - बोरगाव (जि. चंद्रपूर).सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारती : प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण प्रथम - करंजेपूल (जि. पुणे), व्दितीय - देर्डे कोऱ्हाळे (जि. अहमदनगर), तृतीय - निंभी खुर्द (जि. अकोला).

राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम - चिंचवली (जि. ठाणे), व्दितीय - शिरवली (जि. पुणे), तृतीय - अंदुरा (जि. अकोला).सर्वोत्कृष्ट गृह संकुले : प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण प्रथम - लोणी (जि. अहमदनगर), व्दितीय - येडोळा (जि. उस्मानाबाद), तृतीय - कणकापूर (जि. नाशिक).

राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम - खारेकर्दुणे (जि. अहमदनगर), व्दितीय - अदासी (जि. गोंदिया), तृतीय - मुणगे (जि. सिंधुदुर्ग). मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लवकरच या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना