शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा गर्दीने फुलला ! गुलाबी थंडीचे आगमन :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:14 IST

गगनबावडा : गगनबावडा परिसर दिवाळी सुट्यांमुळे पर्यटकांनी फुल्ल झाला आहे. ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून गगनबावाड्याचा उल्लेख केला

ठळक मुद्देलखमापूर, अणदूर, कोदे, वेसरफ तलाव पर्यटकांचे आकर्षणनिसर्गाच्या सान्निध्याचा पर्यटकांना आस्वाद घेता येतो गर्दीमुळे हॉटेल, किराणा दुकान, निवासस्थाने यांना ‘अच्छे दिन’

गगनबावडा : गगनबावडा परिसर दिवाळी सुट्यांमुळे पर्यटकांनी फुल्ल झाला आहे. ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून गगनबावाड्याचा उल्लेख केला जातो. वातावरणात थोडीशी थंडी पडू लागल्याने शाळांच्या सुट्यांमुळे हिवाळ्यातील गुलाबी थंडीतून पर्यटकांची वर्दळ गगनबावड्यात पाहावयास मिळत आहे. कोकणाला जोडणाºया करूळ व भुईबावडा या दोन्ही घाटमाथ्यांमुळे गोवा, सिंधुदुर्ग यासह कोकण दर्शनासाठी जाणाºया पर्यटकांची लागलेली रीघ दिसत आहे.

गगनबावड्यातील निसर्ग सौंदर्यात भर घालणारे लखमापूर, अणदूर, कोदे, वेसरफ या ठिकाणी असणारे तलाव पर्यटकांना आकर्षण केंद्र बनले आहे. साहजिकच पर्यटकांचा त्या ठिकाणी ओढा वाढलेला दिसतो. पाण्याने भरलेले तलाव सभोवतालची हिरवळ, झाडे, काही तलावांच्या ठिकाणी असणारे सिमेंट कट्टे, मनसोक्तपोहणे यामुळे तलाव ठिकाणी कुटुंबासह सहली आयोजित केल्या जात आहेत. पर्यटकांच्या वाढत्या वावरामुळे सभोवताली चारचाकी, दोन चाकी वाहनांची गर्दी दिसून येते. डोंगराळ, दुर्गम कोदे या तलावाजवळ पर्यटकांसाठी जेवणासाठी हॉटेल सुविधाही मिळत आहे. त्यामुळे तलावाजवळ पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसून येतात. हिरवेगार डोंगरमाथ्यामुळे पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते.गगनबावड्यातील गगनगिरी महाराजांच्या गगनगिरी मठावरून (गगनगड ) कोकण दृश्य टिपण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. दोन्ही घाटमाथेच्या मध्ये असणारा गगनगडावरून कोकण दृश्य टिपता येते. पळसंबे येथील जंगलातील शांत वातावरणातील ‘रामलिंग मठ’ (पुरातन लेणी) पुरातन काळाची आठवण करून देतात. येथील थंड पाण्याबरोबरच प्राचीन लेणी भुरळ घालणारी आहेत. बोरबेट येथील मोरजाई व वेताळ माळ येथील निसर्गाच्या सान्निध्याचा पर्यटकांना आस्वाद घेता येतो. पर्यटकांच्या या गर्दीमुळे हॉटेल, किराणा दुकान, निवासस्थाने यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.मद्यपींचा पर्यटकांना त्रासतलावाजवळ पाणी असल्याने कुटुंबासह आलेले अनेक पर्यटक स्वत: जेवण तयार करून खातात. त्या ठिकाणी काही तरुण मंडळी दारू पिऊन तर्र अवस्थेत असतात. त्यामुळे महिला पर्यटकांना, स्थानिक स्त्रिया व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे त्या मद्यपींचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्व थरातून होत आहे.

टॅग्स :Travelप्रवासFamilyपरिवार