शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Kolhapur: 'गडहिंग्लज जनता दल'  कोणत्या वाटेने?; श्रीपतराव शिंदे यांच्या पश्चात पहिलाच व्यापक मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:00 IST

लोकांचे प्रश्न सत्तेमुळे नव्हे तर संघर्षातूनच सुटतात,यावरच शिंदेंचा ठाम विश्वास होता

राम मगदूमगडहिंग्लज : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिवंगत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या पश्चात गडहिंग्लज विभागातील कार्यकर्त्यांचा पहिलाच  मेळावा आज, मंगळवारी होत आहे. त्यामुळे 'गडहिंग्लज'चा जनता दल देवेगौडांच्या की शिंदेंच्या वाटेने जाणार? याची उत्सुकता कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आहे.गेल्या तीन दशकात महाराष्ट्रासह देशातील राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. एकेकाळी देशात आणि राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या जनता दलाचीही अनेक छकले झाली. परंतु, माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी कर्नाटकात आणि महाराष्ट्रात केवळ शिंदेनी आपल्या तालुक्यात अस्तित्व टिकवले.'समाजवादी पक्ष ते जनता दल' वाटचालीत शिंदे अखेरपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. म्हणूनच कोल्हापूर जिल्हयासह राज्याच्या राजकारणात त्यांचे नाव चर्चेत राहिले. देशात- राज्यात पक्षाची कुठेही सत्ता नसतानाही त्यांनी गडहिंग्लज नगरपालिका व कारखान्यावरील वर्चस्व कायम राखले. त्यामुळे चंदगड व कागल मतदारसंघात  त्यांची भूमिका निर्णायक राहिली.शिंदेंच्या कन्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनीही वडीलांचा विचार आणि वारसा पुढे चालवण्याचा इरादा शोकसभेतच स्पष्ट केला आहे. दरम्यान,कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाची धुरा त्यांच्याकडेच सोपवल्यामुळे त्यांच्या भूमिकेवरच येथील वाटचाल अवलंबून आहे.दरम्यान,माजी पंतप्रधान देवेगौडा,त्यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी घेतलेला भाजपप्रणित आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय महाराष्ट्रातील अनेक  कार्यकर्त्यांना रूचलेला नाही. त्यामुळे कांहीजण आमदार अबु आझमी यांच्या समाजवादी पक्षात गेले. परंतु, शिंदेंनी घडवलेल्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर अजूनही 'मोळीवाल्या बाई'चीच पताका आहे. 

तर 'तिथे'च पोहचणार!गडहिंग्लज शहरात राष्ट्रवादी हाच जनता दलाचा पारंपरिक राजकीय शत्रू आहे. अलिकडेच तीन प्रमुख माजी नगरसेवकांनी  राष्ट्रवादीत जावून मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केले आहे. त्यामुळे 'तिथे' अजिबात जाणार नाही,असे स्वाती कोरींनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. परंतु,देवगौडांच्या वाटेने गेल्यास त्या तिथेच पोहचणार आहेत.

'इंडिया आघाडी'च पर्याय स्वाती कोरींच्याकडे नगरपालिका, कारखाना, कुक्कुटपालन, तंत्रनिकेतनमधील कामाचा अनुभव, संघटन कौशल्य, वक्तृत्व कला आहे.त्यामुळे येत्या विधानसभेला कागल व चंदगड दोन्ही मतदारसंघात त्यांना उमेदवारीची आहे.परंतु, त्यासाठी 'इंडिया आघाडी' हाच चांगला पर्याय असून लोकसभा निवडणुकीतच निर्णय घ्यावा लागणार आहे.

'शिंदें'चा विश्वास संघर्षावरच !लोकांचे प्रश्न सत्तेमुळे नव्हे तर संघर्षातूनच सुटतात,यावरच शिंदेंचा ठाम विश्वास होता.त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या अमिषाला बळी न पडता ते अखेरपर्यंत रस्त्यावरची लढाई लढत राहिले.धर्मांध व जातीयवादी शक्तींशी कधीच हातमिळवणी केली नाही.त्यांचा हाच विचार लोकांचे मनोबल वाढवणारा आणि पक्षाला उभारी देणारा आहे.त्याचे भान ठेवूनच निर्णय व्हावा, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण