शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सुंदर बसस्थानकाचा मान गडहिंग्लज, चंदगडला; एस.टी. महामंडळाने घेतली स्पर्धा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 16:39 IST

प्रवाशांना सेवा कशी दिली जाते हा देखील निकष

कोल्हापूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सुंदर बसस्थानक अभियानात पुणे विभागाअंतर्गत घेतलेल्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लजने दुसरा आणि चंदगड आगाराने तिसरा क्रमांक पटकाविला. गडहिंग्लजने ‘अ’ वर्ग गटात ७५ गुण मिळवून अडीच लाख रुपये, तर ‘ब’ वर्ग गटात चंदगडने ८२ गुण मिळवून दीड लाख रुपये पटकाविले.राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत राबविले. बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेत बागबगीचा, वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटर कूलर, घड्याळ, सेल्फी पॉइंटचे मूल्यांकन झाले. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवासुविधा, बस स्वच्छता, फिटनेस बसचा विचार करून वर्षभर समितीने बसस्थानकाचे मूल्यांकन करून गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षिसासाठी निवड झाली.

बसस्थानकाचे वर्गीकरणप्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण झाले. पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक जाहीर केले. प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बसस्थानकाला राज्यस्तरावरील अंतिम फेरीसाठी निवडले. त्यातून सर्वाधिक गुण मिळवणारे बसस्थानक पहिल्या क्रमांकासाठी निवडले.

या गटांत स्पर्धा (पुणे विभाग)‘अ’ गट : फलटण (सातारा विभाग), गडहिंग्लज (कोल्हापूर विभाग), दहिवडी (सातारा विभाग)‘ब’ गट : अकलूज (सोलापूर विभाग), कराड (सातारा विभाग), चंदगड (कोल्हापूर विभाग)‘क’ गट : मेढा (सातारा विभाग), औंध (सातारा विभाग), पुसेसावळी (सातारा विभाग)

आगाराला मिळालेले गुणआगार - गुण‘अ’ वर्ग

  • फलटण ७५
  • गडहिंग्लज ७५
  • दहिवडी ७५

‘ब’ वर्ग

  • अकलूज ८५
  • कराड ८३
  • चंदगड ८२

‘क’ वर्ग

  • मेढा ८७
  • औंध ७४
  • पुसेसावळी ७०

लाखाचे बक्षीसकोल्हापूर विभागगडहिंग्लज ५ लाख रुपयेचंदगड १.५ लाख रुपये

सातारा विभागफलटण १० लाखदहिवडी २.५ लाखकराड २.५ लाखमेढा १ लाखऔंध ५० हजारपुसेसावळी २५ हजार

सोलापूर विभागअकलूज ५ लाख रुपये

सर्व कर्मचार्यांनी केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे यश मिळाले आहे. सुंदर बसस्थानक झाल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. - गुरुनाथ रणे, आगारप्रमुख, गडहिंग्लज

टॅग्स :kolhapurकोल्हापूर