शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

"गडहिंग्लज कारखाना कुणीही बंद पाडू शकणार नाही", अ‍ॅड. श्रीपतराव शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 19:57 IST

दिवंगत आप्पासाहेब नलवडे व सहका-यांनी जिद्दीने उभारलेला गडहिंग्लज साखर कारखाना कुणीही बंद पाडू शकणार नाही. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत मी तो कदापीही बंद पडू देणार नाही.

गडहिंग्लज : दिवंगत आप्पासाहेब नलवडे व सहका-यांनी जिद्दीने उभारलेला गडहिंग्लज साखर कारखाना कुणीही बंद पाडू शकणार नाही. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत मी तो कदापीही बंद पडू देणार नाही. कामगार, शेतकरी आणि सहानुभूतीदार व्यक्ती आणि संस्थांच्या इच्छाशक्तीमुळेच तो सुरू झाला आहे. आम्ही १२ संचालक तो हिमतीने यशस्वीरित्या चालवू, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी व्यक्त केला.हरळी येथे कार्यस्थळी बॉयलर अग्निप्रदीपनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे होते. राष्ट्रवादीच्या ४ संचालकांसह शहापूरकर गटाचे ३ संचालक यावेळी अनुपस्थित होते.शिंदे म्हणाले, आठवडाभरात गळीताला सुरूवात होईल. ह्यएफआरपीह्णप्रमाणे होणारी ऊसबीले १५ दिवसांत आणि कामगारांना ८.४४ टक्के बोनस देवू.नलवडे म्हणाले, दुभती म्हैस रक्तबंबाळ होईपर्यंत पिळतात, तसे कारखान्याला पिळू नका, असे मी म्हणालो होतो. ते कुणाला लागले म्हणूनच कंपनीने कारखाना सोडला असेल तर त्याची आपल्याला चिंता नाही.संचालक प्रकाश चव्हाण म्हणाले, हक्काचा कारखाना म्हणून शेतकºयांनी आपला ऊस राखून ठेवला आहे. त्यामुळे यावर्षी ३ लाख टनाचे गळीत होईल.अमर चव्हाण म्हणाले, वयाची पर्वा न करता अध्यक्ष शिंदेंनी केलेली धडपड आणि कामगारांच्या इच्छाशक्तीमुळेच कारखाना सुरू होत आहे.म्हणूनच कारखाना तोट्यातशहापूरकरांनी कारखान्याच्या पैशातून इंचनाळ बंधारा व दाभेवाडीची पाणी योजना राबविली. त्यामुळेच कारखाना तोट्यात आला, असा आरोप शिंदेंनी केला.जिल्हाधिका-यांचे अभिनंदन..!ब्रिस्क कंपनीने कामगार न्यायालयाच्या निकालाविरूद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामुळेच सेवानिवृत्त कामगारांच्या देणीचा प्रश्न प्रलंबित आहे. म्हणूनच हा प्रश्न आपल्या अखत्यारित येत नाही, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्पष्ट केले. त्यांचे मी अभिनंदन करतो, असेही शिंदे म्हणाले.आजी-माजी सैनिकांकडून १० लाखआजी-माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी कारखाना चालविण्यासाठी ठेवीच्या स्वरूपात १० लाखाची मदत केली. त्यांच्यासह सर्व ठेवीदारांचे पैसे व्याजासह परत करू, अशी ग्वाही शिंदेंनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर