शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

गडहिंग्लज पालिका बांधणार खाटीक समाजासाठी सभागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 18:27 IST

पोतदार ले-आऊटमधील खुल्या जागेत खाटीक समाजासाठी बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह बांधण्याचा निर्णय Muncipal Corporation kolhapur-गडहिंग्लज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने झाला. परंतु, त्या परिसरातील लिंगायत व जैन समाजाचा विरोध असल्यामुळे त्या जागेऐवजी हे सभागृह अन्यत्र बांधावे अशी लेखी सूचना करत विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला.

ठळक मुद्देगडहिंग्लज पालिका बांधणार खाटीक समाजासाठी सभागृह राष्ट्रवादीचा विरोध : सर्वसाधारण सभेत बहुमताने निर्णय

गडहिंग्लज :पोतदार ले-आऊटमधील खुल्या जागेत खाटीक समाजासाठी बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह बांधण्याचा निर्णय गडहिंग्लज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने झाला. परंतु, त्या परिसरातील लिंगायत व जैन समाजाचा विरोध असल्यामुळे त्या जागेऐवजी हे सभागृह अन्यत्र बांधावे अशी लेखी सूचना करत विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला.नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सत्ताधारी आघाडीचे पक्षप्रतोद बसवराज खणगावे यांनी खाटीक समाजाच्या सांस्कृतिक सभागृहाची सूचना मांडली. त्याला विरोधी पक्षनेते हारूण सय्यद व दीपक कुराडे यांनी हरकत घेतल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली.पोतदार ले-आऊट परिसरातील नागरिक व खाटीक समाजाची एकत्र बैठक घेवून चर्चेतून तोडगा काढा किंवा वडरगे रोड, कडगाव रोडवरील खुल्या जागेत सभागृह बांधून द्या आणि त्याजागी नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधा, अशी सूचना सय्यद, कुराडे व शशीकला पाटील यांनी केली.नगराध्यक्षा कोरी म्हणाल्या, खाटीक समाजाने ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वयोवृद्धांसाठी विरंगुळा केंद्र आणि महिलांसाठी स्वंयरोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी सांस्कृतिक सभागृहाची मागणी केली आहे. ते पालिकेच्या मालकीच्या जागेवरच बांधण्यात येणार आहे. माणुसकीच्या भावनेतून त्याला मंजुरी द्यावी.घरफाळा उशीरा भरणाऱ्यांना २ टक्के दंडाची आकारणी करू नये, अशी मागणी कुराडेंनी तर करमागणीची नोटीस लवकर देण्याची सूचना सय्यद यांनी केली. मात्र, शासनाच्या आदेशानुसारच दंड आकारला जातो, असा खुलासा मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी तर नागरिकांच्या सोयीसाठीच करमागणी नोटीस उशीरा देत असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. चर्चेत उपनगराध्यक्ष महेश कोरी, नरेंद्र भद्रापूर, रेश्मा कांबळे यांनीही भाग घेतला.पुरोगामी गडहिंग्लज कुठे चालले आहे ?विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांचा विरोध आहे म्हणून खाटीक समाजाला सांस्कृतिक सभागृह नाकारणे चुकीचे आणि मनाला वेदना देणारी बाब आहे. पुरोगामी गडहिंग्लज शहर कोणत्या दिशेने चालले आहे? या शब्दांत नगराध्यक्षा प्रा. कोरींनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केली.१५ व्या वित्त आयोगाचा निधी नको का ?चतुर्थ वार्षिक करआकारणी पूर्वीच्या पद्धतीनेच करावी, अशी सूचना सय्यद यांनी केली. परंतु, शासनाच्या निर्देशाप्रमाणे भांडवली मूल्याच्या आधारेच ही आकारणी करावयाची असून त्याचा खर्च आणि प्रशिक्षण शासनाकडून मिळावे, असा ठराव शासनाला पाठवता येईल, पण या आदेशाचे पालन झाले नाही तर १५ व्या वित्त आयोगाचा निधी पालिकेला मिळणार नाही, असे नगराध्यक्षा कोरी यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर