शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज कारखान्याने ब्रिस्कला २४ कोटी ६५ लाख द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 16:11 IST

Sugar factory Kolhapur : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीला २४ कोटी ६५ लाख रूपये द्यावेत, असा आदेश सहकार खात्याचे अतिरिक्त सचिव अरविंदकुमार यांनी दिला आहे. आदेशापासून तीन महिन्यात म्हणजेच २१ आॅगस्ट २०२१ पर्यंत ही रक्कम द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे तीन महिन्यांची मुदत अतिरिक्त सहकार सचिव अरविंदकुमार यांचा आदेश

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीला २४ कोटी ६५ लाख रूपये द्यावेत, असा आदेश सहकार खात्याचे अतिरिक्त सचिव अरविंदकुमार यांनी दिला आहे. आदेशापासून तीन महिन्यात म्हणजेच २१ आॅगस्ट २०२१ पर्यंत ही रक्कम द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.२०१४ पासून ब्रिस्कने सहयोग तत्वावर १० वर्षांसाठी हा कारखाना चालवायला घेतला होता. परंतु, मुदतीपूर्वीच यावर्षी हंगामाच्या अखेरीस यापुढे कारखाना चालविणार नसल्याचे कंपनीने शासनाला कळविले होते. त्यानुसार सहकार विभागाच्या समितीने ९ एप्रिलला हा कारखाना कंपनीकडून संचालक मंडळाच्या ताब्यात दिला आहे.दरम्यान, कंपनी व कारखाना यांच्यातील येणी-देणीसंदर्भात अरविंदकुमार यांच्यासमोरच सुनावणी झाली होती. त्याबाबतचा त्यांनी हा आदेश दिला आहे. साखर आयुक्तांनी ही रक्कम कारखान्याकडून वसूल करून कंपनीला ुद्यावयाची आहे.मुदतीत रक्कम न दिल्यास कारखान्याने कंपनीला ८ टक्के व्याज द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. कारखाना चालविण्यास संचालक मंडळ असमर्थ ठरल्यास कारखाना चालवायला घेणाऱ्या कंपनीने ह्यब्रिस्कह्णच्या देय रक्कमेची पूर्तता करावी, अशी अटदेखील आदेशात घालण्यात आली आहे. कारखान्याने कंपनीला द्यावयाची रक्कमकंपनी व कारखाना दरम्यानच्या करारात सभासदांना १० किलो साखर देण्याचे नमूद होते. परंतु, संचालकांच्या मागणीनुसार कंपनीने उत्पादकाला वर्षाला १०० किलो तर अनुत्पादकाला ५० किलो साखर दिली आहे. करारात नसतानाही दिलेल्या साखरेपोटी कंपनीचा ९ कोटी १७ लाख जादा खर्च द्यावा.

  • करारात नसतानाही कंपनीने भागवलेले युनियन बँक व स्टेट बँकेचे मिळून ७ कोटी ९१ लाख द्यावेत.
  • प्रदूषण नियंत्रणासाठी कंपनीने केलेला ८ कोटी ८२ लाख खर्च द्यावा.
  • करारानुसार कंपनीने कारखान्याला व्यवस्थापन खर्चापोटी १ कोटी २५ लाख रूपये द्यावेत.

 कंपनीच्या या मागण्या फेटाळल्याकारखान्याच्या विस्तारीकरणासाठी कंपनीने केलेल्या ९ कोटी ३७ लाखाचा खर्च आणि कामगारांच्या वाढीव पगारापोटी जादा खर्च केलेल्या १ कोटीची कंपनीची मागणी फेटाळ्यात आली. ४ जूनच्या बैठकीत निर्णयसहकार सचिवांचा आदेश आणि कारखाना सुरू करण्यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी (४ जूनला) बोलविण्यात आली आहे. या बैठकीकडे गडहिंग्लजसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर