शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अंगारा, भंडाराच ठरविणार उमेदवारांचे भवितव्य

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

मतदारांना शपथा : ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी

गणपती कोळी - कुरूंदवाड  ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचे मतपरिवर्तन करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावल्या जाणाऱ्या या निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे असून, दगाफटका होऊ नये म्हणून देवालाच साक्षीला घातले जात आहे. अंगारा, भंडारा, बुक्का, कुराणाची शपथ देत असल्याने देवाचे हे ‘भस्म’च उमेदवारांचे भवितव्य ठरवित आहे.सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत सत्तेतून तालुका व जिल्हा स्तरावर आपला राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी गावागावांतील गटनेता आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी राजकीय शक्ती पणाला लावत आहे. तर विरोधी गट नेत्यांनेही तुल्यबळ उमेदवार देत आव्हान उभे केल्याने बहुतेक ग्रामपंचायतीत काट्याची लढत होत आहे.ग्रामपंचायत निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी व उमेदवारांसाठी राजकारणाची पहिली पायरी समजली जाते. राजकारणाच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नसलेले हे सदस्यपद असले तरी आपल्याच प्रभागात विरोधी उमेदवाराचा पराभव करून आपले जनमत विरोधकांपुढे, आपल्या गट नेत्याला दाखविण्याच्या भावनेतून राजकीय ईर्षा पेटली आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर निवडून येण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता उमेदवारांनी ठेवल्याने अत्यंत चुरस निर्माण झाली आहे.मर्यादित मतदारसंख्येचा प्रभाग असल्याने व एक, दोन मतातच अनेक उमेदवारांचा पराभव अथवा विजय होत असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक मताला महत्त्व आहे. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, प्रचारापेक्षा मतपरिवर्तनाला अधिक महत्त्व दिले जात आहे. उमेदवार एखाद्या समाजप्रमुखाला, मंडळाच्या अध्यक्षाला गाठून आश्वासनाबरोबर इच्छांची पूर्तताही करीत आहे. इच्छापूर्ती करीत असताना गुप्त मतदान पद्धतीतून दगाफटका बसू नये, याची दक्षता घेत ज्या-त्या समाजाचे कुलदैवत, ग्रामदैवतांचा अंगारा, भंडारा, बुक्का, कुराण हातात घेऊन शपथ घेण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे उमेदवाराचा, गटनेत्यांचा मतदारावर विश्वास नसला तरी भंडारा, अंगाऱ्यावर विश्वास असून, उमेदवारांचे भवितव्य भंडारा, अंगाराच ठरवित आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने गावागावांत अंधश्रद्धाही तितकीच प्रभावी झाली असून, उमेदवार संकटावेळी देवालाच साक्षीला घालत आहे. त्यामुळे कोणता देव कोणाला प्रसन्न होतो, याचा फैसला निकालानंतरच होणार आहे.