शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

अमर रहे! जवान अविनाश कागिनकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:45 IST

हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला येथे सैन्यदलात सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाला मृत्यू

हलकर्णी : हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला येथे सैन्यदलात सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू पावलेले जवान अविनाश आप्पासाहेब कागिनकर यांच्यावर त्यांच्या जन्मगावी नंदनवाड (ता. गडहिंग्लज) येथे बुधवारी (२९) सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय सैन्याच्या आर्मी सप्लाय कोअर सेंटरमध्ये त्यांनी ७ वर्षे सेवा बजावली होती.बुधवारी (२९) सकाळी साडेनऊ वाजता अविनाशचे पार्थिव नंदनवाड स्टॉपवर आणण्यात आले. तेथून ‘भारत माता की जय... अविनाश कागिनकर अमर रहे... अमर रहे...’च्या घोषणांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांची अंत्ययात्रा काढली. गावातील आदिती फौंडेशनचे संस्थापक दिनकर सावेकर यांनी या अंत्यविधीसाठी एक लाखाची देणगी दिली. यावेळी १८५४ कोअर बटालियन धर्मशाला सेंटरचे सुभेदार व्ही. राजेंद्रन, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शीतल शिसाळ, जिल्हा सैनिक बोर्डाचे चंद्रशेखर पांगे, संतोष पाटील, नागेश चौगुले, विद्याधर गुरबे, रियाज शमनजी, गंगाधर व्हसकोटी, बाळेश नाईक, सरपंच शेवंता मगदूम, भारती रायमाने आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अविनाश यांना श्रद्धांजली वाहिली.

वडील आप्पासाहेब यांनी जवान मुलाच्या चितेस भडाग्नी दिला. यावेळी आई सुवर्णा, भाऊ वैभव, पत्नी राजलक्ष्मी यांच्यासह नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी रेखाताई हत्तरकी, उपसरपंच बाबू केसरकर, तायगोंडा बोगरनाळ, मंडल अधिकारी विजय कामत, ग्रामसेवक दत्ता पाटील, गावातील आजी-माजी सैनिक यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

‘कुंकू’ कायम राहणार

अविनाश यांची पत्नी राजलक्ष्मी यांच्या कपाळावरील कुंकू अबाधित ठेवून गावात ‘विधवा प्रथा’ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील आजी-माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक व ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांनी विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याची घोषणा अविनाश यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी करण्यात आली.

गावातील तिघांना वीरमरण

१९८७ मध्ये शांती सेनेत सेवा बजावत असताना गावचे सुपुत्र नागेश मोरे यांना श्रीलंकेत वीरमरण आले होते. त्यानंतर गावातील भीमगोंडा बोगरनाळ या जवानाचा गोव्यात प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराने, तर कागिनकर यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर