शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

शहीद जवान जोतीबा चौगुले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:56 IST

शहीद जवान जोतीबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी येथे पोलीस आणि लष्कराच्या प्रत्येकी आठजणांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत ३ फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार संजय मंडलीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

ठळक मुद्देउंबरवाडी येथे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदनापोलीस,लष्कराच्या प्रत्येकी आठ तुकडीच्या जवानांनी वाजवले अंतिम बिगुल

कोल्हापूर :  शहीद जवान जोतीबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी येथे पोलीस आणि लष्कराच्या प्रत्येकी आठजणांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत ३ फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार संजय मंडलीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.शहीद जवान जोतीबा चौगुले यांचे पार्थिव आज बुधवारी ७-३० वा हरळी येथे पोहचले. या ठिकाणाहून लष्कराच्या फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थ, विद्यार्थी - विद्यार्थिनी पुष्पहार आणि फूले वाहून आदरांजली वाहत होते.

"अमर रहे अमर रहे जोतीबा चौगुले अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम" अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा महागाव येथे पोहचली. येथून फुलांनी सजवलेल्या वाहनातून ही अंत्ययात्रा उंबरवाडी येथील निवासस्थानी आली. या ठिकाणी काही काळ अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. वडील गणपती चौगुले, आई वत्सला, पत्नी यशोदा आणि नातेवाईकांनी दर्शन घेतले.रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. चौका- चौकात फलक लावून आदरांजली वाहिली होती.ही अंत्ययात्रा अंतिम संस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर खासदार संजय मंडलीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पार्थिवाला पुष्पचक्र वाहिले. जिल्हाधिकारी देसाई यांनी वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.प्रांताधिकारी विजया पांगारकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने, तहसीलदार दिनेश पारगे, कर्नल संजीव शौरी, कर्नल संजय शिंदे, लेफ्टनंट कर्नल सी बी मस, सुभेदार मेजर जयवंत नगरे आदींनी पार्थिवाला पुष्पचक्र वाहून मानवंदना देऊन आदरांजली वाहिली.

माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, पंचायत समिती सभापती विजय पाटील यांच्यासह आजी-माजी लष्कराचे जवान, ग्रामस्थ, विविध अधिकारी-पदाधिकारी यांनीही पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

आमदार राजेश पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी पाठवलेला शोकसंदेश यावेळी वाचून दाखवण्यात आलापोलीस आणि लष्कराच्या प्रत्येकी आठ जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या ३ फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली.

यानंतर शहीद जवान जोतीबा चौगुले यांचा मुलगा अथर्व याच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अधिकारी, पदाधिकरी त्याचबरोबर कोल्हापूर, बेळगाव येथून लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर