शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

सांगरुळच्या ऐतिहासिक बंधाऱ्यासाठी निधी मंजूर-‘लोकमत’चा पाठपुरावा

By admin | Updated: August 27, 2014 23:23 IST

१०.७२ लाख मंजूर : कोेगे खडक, कळे, तिरपण बंधारा दुरुस्तीसाठी निधी

सांगरुळ : करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील ऐतिहासिक बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाने १० लाख ७२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबरोबरच कोगे खडक, पन्हाळा तालुक्यातील कळे, तिरपण बंधाऱ्यांच्या डागडुजीसाठीही निधी मंजूर झाला. सांगरुळ परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन जून १९५० मध्ये सांगरुळ धरण संस्थेची स्थापना करत कुंभी नदीवर देशातील पहिला सहकार तत्त्वावरील बंधारा बांधला. हा बंधारा पाहूनच ‘केटी वेअर’ (कोल्हापूर टाईप बंधारा) बंधारे संपूर्ण देशात बांधले गेले. हा बंधारा बांधून ६५ वर्षे झाल्याने त्याची पडझड सुरू झाली होती. अनेक पिलर कोसळले आहेत. या बंधाऱ्यावरून वाहतूक नसली तरी यामध्ये पाणी आडवून सांगरुळपासून मरळीपर्यंतच्या सात गावांतील एक हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होतो. पिलर कोसळल्याने बरगे बसत नाहीत. परिणामी, उन्हाळ्यात पाणी वाहून जाते. वयोमान झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा ढासळण्याची भीती होती. त्यामुळे बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी गेली अनेक वर्षे शासनदरबारी प्रयत्न सुरू होते. सांगरुळ धरण संस्थेचे अध्यक्ष उत्तम पाटील, उपाध्यक्ष उत्तम कासोटे, सचिव बळिराम साळोखे व संचालक मंडळाने कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निधीची मागणी केली होती. मंत्री मुश्रीफ यांनी तत्काळ बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १० लाख ७२ हजार रुपये मंजूर केले. त्याचबरोबर या संस्थेच्या कोगे खडक धरणाच्या दुरुस्तीसाठी दहा लाख निधी दिला. तसेच पन्हाळा तालुक्यातील कळे बंधाऱ्यासाठी पाच लाख, तर तिरपण बंधाऱ्यासाठी आठ लाख रुपये मंजूर केले आहेत. ‘लोकमत’चा पाठपुरावा‘सांगरुळचा ऐतिहासिक ठेवा ढासळतोय!’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने आवाज उठवत पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने यासाठी निधी दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला यश मिळाल्याने परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्राला संजीवनी मिळणार आहे. यासाठी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील यांच्यासह पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी बी. एस. घुणकीकर, शाखाधिकारी एस. डी. काटे, बी. एस. जाधव यांचे मोठे सहकार्य मिळाले. - उत्तम कासोटे (उपाध्यक्ष, सांगरुळ धरण संस्था)गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला यश मिळाल्याने परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्राला संजीवनी मिळणार आहे. यासाठी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील यांच्यासह पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी बी. एस. घुणकीकर, शाखाधिकारी एस. डी. काटे, बी. एस. जाधव यांचे मोठे सहकार्य मिळाले. - उत्तम कासोटे (उपाध्यक्ष, सांगरुळ धरण संस्था)