शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी छत्रपती शाहू समाधीकरिता आठ कोटींचा निधी  : एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 19:11 IST

Eknath Shinde Muncipal Corporation kolhapur- नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक परिसरात उभारल्या जाणाऱ्या आर्ट गॅलरी तसेच अन्य विकास कामांकरिता राज्य सरकारतर्फे आठ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेत झालेल्या बैठकीत दिले.

ठळक मुद्देराजर्षी छत्रपती शाहू समाधीकरिता आठ कोटींचा निधी  : एकनाथ शिंदे शाहू मिल बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार

कोल्हापूर : नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक परिसरात उभारल्या जाणाऱ्या आर्ट गॅलरी तसेच अन्य विकास कामांकरिता राज्य सरकारतर्फे आठ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेत झालेल्या बैठकीत दिले.

शाहू मिलच्या जागेतील स्मारक कामाचा विषय मोठा असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी आढावा बैठकीत छत्रपती शाहू समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निधी देण्याची मागणी केली होती.

पहिल्या टप्प्यात समाधी स्मारक, सुशोभिकरणाची अडीच कोटींची कामे महापालिकेने स्वनिधीतून केली, परंतू दुसऱ्या टप्प्यात नजिकचा बाबासाहेब आंबेडकर हॉलचे नवीन बांधकाम करुन त्याठिकाणी आर्ट गॅलरी करण्यात येणार असल्याचे सरनोबत सांगितले. त्यावेळी आठ कोटी रुपये देण्याची ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली.शाहू मिलच्या जागेतील शाहू स्मारकाबाबत बैठकीत चर्चा झाली. तेंव्हा हा विषय मोठा असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांनी यासंदर्भात आपण एक आराखडा तयार केला असून तो राज्य सरकारने विचारात घ्यावा, अशी सूचना केली.महापालिकेतर्फे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी प्रलंबित कामांचे तसेच पूर्ण झालेल्या विकास कामांचे सादरीकरण केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर