शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राधानगरी तहसील इमारत अद्यावत होणार, साडेचौदा कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 12:34 IST

गौरव सांगावकर राधानगरी : जिल्ह्यातील पर्यटनाची पंढरी म्हणून राधानगरी प्रसिद्ध आहे. पर्यटनासोबत हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कार्यालयीन कामकाजासाठी तालुक्यातील ...

गौरव सांगावकरराधानगरी : जिल्ह्यातील पर्यटनाची पंढरी म्हणून राधानगरी प्रसिद्ध आहे. पर्यटनासोबत हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कार्यालयीन कामकाजासाठी तालुक्यातील लोक रोज या ठिकाणी येथे असतात. पण येथे असणारी तहसीलची इमारत ही जीर्ण झाल्यामुळे अधिकारी व नागरिकांची गैरसोय होत होती, तसेच नागरिकांना एकाच छताखाली शासकीय सुविधा मिळाव्यात, याकरिता राधानगरी येथे नवीन सुसज्ज तहसील कार्यालय बांधणे गरजेचे होते. याकरिता शासनस्तरावर तहसील कार्यालय बांधकामासाठी मार्ग मोकळा झाला आहे. याकरिता १४ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.तालुक्यातील महसुली कामकाज गेले एक तप संस्थानकालीन इमारतीमध्ये सुरू होते. या ठिकाणी अद्ययावत इमारती नसल्याने शासनाचा अविभाज्य घटक मानल्या जाणाऱ्या महसूल विभागाचा कारभार अपुऱ्या जागेमध्ये सुरू होता. तहसील कार्यालय व इतर सर्व विभाग एकत्रितपणे जुन्या इमारतीतच कार्यरत होते. यामुळे सदर ठिकाणी नवीन व सुसज्ज इमारत बांधणे गरजेचे होते.या बाबतचा प्रस्ताव बांधकाम विभाग यांचे मार्फत विहीत नमुना व अंदाजपत्रकासह मुख्य अभियंता पुणे यांची तांत्रिक मान्यता घेऊन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे कार्यालयाकडून विभागीय आयुक्त पुणे यांच्यामार्फत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास महसूल व वन विभागाच्या दि.१६ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

सुविधासुसज्ज तहसील इमारत, तहसीलदार यांचे प्रशस्त बैठक हॉल, वातानुकूलित रूम, दुय्यम निबंधक कार्यालय, महसूल कार्यालय, तहसील विभाग अंतर्गत सर्व विभाग स्वातंत्र्य रूम, प्रशस्त वाहन पार्किंग सुविधा, फर्स्ट फ्लोअर गार्डन,

शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून या कामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सहकार्य लाभले - आमदार प्रकाश आबिटकर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर