शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

फुुलेवाडी टोलनाका फोडला; चौघांना अटक

By admin | Updated: June 20, 2015 00:51 IST

राजवाडा पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या.

कोल्हापूर : टोल देण्यावरून झालेल्या वादावादीचे पडसाद शुक्रवारी फुलेवाडी टोलनाक्यावर उमटले. शिवसेनाप्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या करवीर तालुकाध्यक्ष व त्याच्या मित्राला बेदम मारहाण केल्यामुळे संतप्त जमावाने या टोलनाक्याच्या केबिनची काच फोडून संताप व्यक्त केला. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस आल्याचे पाहताच जमाव पसार झाला. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या.याबाबत जयवंत मारुती येरुडकर (वय ३०, रा. मडिलगे बुद्रुक, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) यांनी अनोळखी टेम्पोचालक व इतर आठ ते दहा अज्ञातांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा संशयित संदीप यशवंत कांबळे (२४, रा. आडूर, ता. करवीर), सचिन बाळासाो पोवार (२३, रा. खटांगळे, ता. करवीर), प्रशांत आंबले (२१, रा. बागल चौक), मारुती आत्माराज नंदिवाले (२९, कोपार्डे, ता. करवीर) या चौघांना पोलिसांनी अटक केली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवसेनाप्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे करवीर तालुकाध्यक्ष संदीप कांबळे व त्याचा मित्र सचिन पोवार हे दोघे शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात शिवसेनेच्यावतीने आयोजित केलेल्या भगव्या सप्ताह कार्यक्रमासाठी मिनी टेम्पोमधून आले होते. कार्यक्रम आटोपून हे दोघे दुपारी आडूर गावाकडे जात होते. टेम्पोचालक सचिन पोवार होता. हा टेम्पो फुलेवाडी टोलनाक्याजवळ आला. त्यावेळी नाक्यावरील कर्मचाऱ्याने संदीप कांबळे याच्याकडे टोल मागितला. संदीपने आम्ही टोल देत नाही, असे सांगितले. त्यावरून कर्मचारी व संदीप यांच्यात वादाला सुरुवात झाली. त्यातून टोलनाक्यावरील सर्व कर्मचारी टेम्पोजवळ आले. त्यांनी संदीपला टेम्पोमधून बाहेर काढले व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला सोडविण्यासाठी गेलेला त्याचा मित्र सचिन पोवारलाही कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर संदीप, सचिनने हा प्रकार शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांना फोनवरून सांगितला.थोड्या वेळाने सात ते आठजण टोलनाक्यावर आले. ते आल्याचे पाहताच टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तेथून धूम ठोकली. यावेळी रस्ता रोको करून संताप व्यक्त केला. टोलनाक्यावर हा प्रकार झाल्याचे समजताच पोलिसांचा फौजफाटा याठिकाणी आला. त्यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणत जमावाला शांत केले. (प्रतिनिधी)तक्रार देणारे आरोपीच्या पिंजऱ्यात...फुलेवाडी टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांनी संशयित संदीप कांबळे व सचिन पोवार यांना मारहाण केली पण, पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्यांच्यावरच अटकेची कारवाई केली.