शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

इंधन दरवाढीचा एफआरपीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 16:04 IST

डिझेलच्या दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम वाहतूक यंत्रणेवर झाला असून, साखर वाहतुकीच्या दरात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. ऊस वाहतुकीच्या दरातही आणखी वाढ होणार असून, पुढील हंगामात किमान १० टक्के वाढ होणार आहे

राजाराम लोंढेकोल्हापूर : डिझेलच्या दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम वाहतूक यंत्रणेवर झाला असून, साखर वाहतुकीच्या दरात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. ऊस वाहतुकीच्या दरातही आणखी वाढ होणार असून, पुढील हंगामात किमान १० टक्के वाढ होणार आहे. टनामागे ६० ते ७० रुपयांची वाढ होणार असल्याने त्याचा फटका एफआरपीला बसणार आहे.

इंधनावर बाजारपेठेतील दर अवलंबून असतात. इंधन दरवाढ झाल्याने वाहतूक वाढते, परिणामी महागाई वाढतच जाते. गेल्या सहा महिन्यांत डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. शंभरी पार करून प्रतिलिटर १०५ रुपयांपर्यंत डिझेल पोहोचले होते. केंद्र सरकारने कर कमी केल्याने आता ९५ रुपयांवर स्थिर असले तरी ते कधीही पुन्हा शंभरी पार करू शकते. त्यामुळे वाहतुकीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील हंगामापेक्षा चालू हंगामात ऊस वाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, पुढील हंगामात यापेक्षाही वाढ होणार आहे. सध्या जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून ऊस तोडणी व वाहतुकीपोटी प्रतिटन ६२५ ते ७२५ रुपयांची कपात करून घेते. पुढील हंगामात त्यामध्ये किमान १० टक्के वाढ होणार असून, ही कपात प्रतिटन ६९० ते ७९० रुपयांपर्यंत जाणार हे निश्चित आहे. त्याचा परिणाम थेट एफआरपीवर होणार आहे. परिणामी पुढील हंगामातील एफआरपीमध्ये सरासरी ६५ रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

साखर वाहतुकीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डिझेलमध्ये प्रतिलिटर ४० ते ४५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दीड-दोन महिन्यापासून साखर वाहतुकीच्या दरातही वाढ झाली आहे. अंतरानुसार टनामागे १०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे.

रोज साखरेच्या ६०० गाड्या बाहेर

कोल्हापुरातून साखर घेऊन रोज साधारणत: ६०० गाड्या जातात. मुंबई, अहमदाबादला साखर जात असली तरी केरळ व कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात साखरेची वाहतूक होते.

दूध वाहतुकीचे दर जैसे थे

डिझेलच्या दरात वाढ झाल्याने इतर वाहतूक वाढली असली तरी ‘गोकुळ’ने दूध वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नाही. भविष्यात इंधनाच्या दरात वाढ झाली तर वाहतुकीचे दर वाढू शकतात.

अशी झाली साखर वाहतुकीमध्ये वाढ (२५ टन क्षमतेची गाडी)मार्ग                                     पूर्वीचा दर             सध्याचा दर

कोल्हापूर-मुंबई                         ७५०                   ८५०कोल्हापूर-पनवेल (बंधारापर्यंत) ७५०                  ८२०

कोल्हापूर - वाशी                        ९००                 १०००कोल्हापूर - अहमदाबाद             १४००                 १७००

कोल्हापूर - राजस्थान             १८५०                  २०००कोल्हापूर - केरळ                    २५००                  २८००

कोल्हापूर - बंगलोर, मंगलोर, म्हैसूर २२००             २५००

गेल्या सात-आठ महिन्यांत डिझेलच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ होऊनही वाहतुकीच्या दरात २० टक्के वाढ केली. तरीही हा व्यवसाय परवडत नाही. -  सुभाष जाधव (अध्यक्ष, लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन)

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFuel Hikeइंधन दरवाढ