शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

‘पवार एके पवार’चे मुश्रीफांना फळ, सर्वाधिक काळ मंत्री राहणारे एकमेव आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:30 IST

राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाल्याने ते सर्वाधिक काळ मंत्री म्हणून काम करणारे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरील निष्ठा, विरोधकांना थेट अंगावर घेण्याची कसब आणि कितीही प्रलोभने आली तरी ‘पवार एके पवार’ या पलीकडे विचार न केल्यानेच त्यांना फळ मिळाले आहे.

ठळक मुद्दे‘पवार एके पवार’चे मुश्रीफांना फळ सर्वाधिक काळ मंत्री राहणारे एकमेव आमदार

कोल्हापूर : राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाल्याने ते सर्वाधिक काळ मंत्री म्हणून काम करणारे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरील निष्ठा, विरोधकांना थेट अंगावर घेण्याची कसब आणि कितीही प्रलोभने आली तरी ‘पवार एके पवार’ या पलीकडे विचार न केल्यानेच त्यांना फळ मिळाले आहे.महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचे निश्चित झाले, त्याचवेळी हसन मुश्रीफ यांचे मंत्रिपद निश्चित झाले होते. विशेष म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर अल्पसंख्याक समाजातील उपमुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवार आग्रही होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या रात्रीतील सत्तानाट्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. पक्षाच्या स्थापनेपासून ते पाचव्यांदा निवडून आले आहेत.

जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट करण्याबरोबरच गेले पाच वर्षांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना थेट अंगावर घेतले. मुश्रीफ यांच्यासारखा अल्पसंख्याक समाजातील आणि आक्रमक नेता पक्षात घेण्यासाठी पाटील यांनी खुली आॅफर त्यांना दिली. मात्र, शरद पवार यांच्यावरील निष्ठेपुढे सगळे दुय्यम असे ठणकावून सांगत त्यांनी पाटील यांची आॅफर नाकारली. त्यानंतर आयकर विभागाचा छापा त्यांच्यावर पडला, तरीही ते नमले नाहीत. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या टार्गेटवर ते राहिले; मात्र ते विरोधकांना पुरून उरले. त्याचे फळ त्यांना मिळाले.यापूर्वी रत्नाप्पाण्णा कुंभार, श्रीपतराव बोंद्रे, सदाशिवराव मंडलिक, दिग्विजय खानविलकर, जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, आदींनी मंत्री म्हणून काम केले. मात्र, १९९९ पासून २०१४ पर्यंत सलग साडेचौदा वर्षे आणि पुन्हा २०१९ ला मंत्री म्हणून संधी मिळणारे ते एकमेव आमदार आहेत.शपथेमध्ये ‘सीमा भागासह संयुक्त महाराष्ट्र’हसन मुश्रीफ यांनी सहाव्या क्रमांकावर दुपारी एक वाजून २० मिनिटांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी उपस्थित समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शपथेच्या शेवटी त्यांनी ‘जय हिंद, जय सीमा भागासह संयुक्त महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली. 

 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफministerमंत्रीkolhapurकोल्हापूर