शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक संघाच्या वतीने भविष्यनिर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 14:52 IST

हायर वेजीस पेन्शनला पात्र असणाऱ्या पेन्शनरांना वाढीव पेन्शन पूर्तता करावी, कोशियारी समितीच्या शिफारशी तत्काळ अमलात आणाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी (दि. १८) सर्व श्रमिक संघ व ईपीएस ९५ पेन्शनरांनी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढला. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी उपायुक्त मुकुंद पाटगावकर यांना दिले.

ठळक मुद्देश्रमिक संघाच्या वतीने भविष्यनिर्वाह निधी कार्यालयावर मोर्चाप्रलंबित मागण्या : भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आंदोलन

कोल्हापूर : हायर वेजीस पेन्शनला पात्र असणाऱ्या पेन्शनरांना वाढीव पेन्शन पूर्तता करावी, कोशियारी समितीच्या शिफारशी तत्काळ अमलात आणाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी (दि. १८) सर्व श्रमिक संघ व ईपीएस ९५ पेन्शनरांनी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढला. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी उपायुक्त मुकुंद पाटगावकर यांना दिले.विक्रमनगर येथून मोर्चास प्रारंभ झाला. दाभोळकर कॉर्नर मार्गे भविष्यनिर्वाह निधी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात पेन्शनर सहभागी झाल्याने मोर्चा कार्यालयाबाहेरील गेटसमोरच अडविण्यात आला. यावेळी आंदोलकांनी आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा, पेन्शनरांना बेदखल करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणा दिल्या.

याप्रसंगी उपायुक्त पाटगावकर यांनी आंदोलकांची भूमिका समजावून घेतली. आंदोलनात अतुल दिघे, गोपाळ पाटील, प्रकाश जाधव, कमलाकर रोटे, नारायण मिरजकर, रवींद्र जाधव, आप्पासो बिडकर, पी. आर. पाटील, आदी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की...पेन्शरांनी विविध न्यायालयांत याचिका दाखल केल्यानंतर जे निर्णय झाले आहेत, त्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. केरळ उच्च न्यायालयाने पेन्शनरांच्या बाबतीत निर्णय दिला आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका घ्यावी. पेन्शन विक्रीची रक्कम परत करण्याचा अवधी १५ वर्षे करण्यात आला आहे. त्यामध्ये १०० महिने अवधी कमी करावा. तसेच कमीत कमी पेन्शन नऊ हजार रुपये व महागाई भत्ता देण्यात यावा.

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित मागण्यांसाठी संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. मात्र आमचे प्रश्न मार्गी लागले नाहीत. आमच्या मागण्यांसाठी आम्ही दोन महिन्यांची मुदत देत आहेत. दोन महिन्यांत प्रश्न मार्गी लागले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.- अनंत कुलकर्णी, सचिव 

 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीMorchaमोर्चाkolhapurकोल्हापूर