शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

भेदरलेली तरुणी अन् भयभीत कुटुंबीय..

By admin | Updated: July 21, 2014 00:40 IST

आॅन दि स्पॉट रिपोर्ट : ‘बसर्गे’तील बलात्कार प्रकरण.

राम मगदूम - गडहिंग्लजविज्ञान शाखेच्या पदवीनंतर कायद्याची सनद घेऊन गरिबांची वकिली करण्याचे ध्येय उराशी बाळगून उच्च शिक्षणासाठी दररोज चार किलोमीटरची पायपीट करणाऱ्या तरुणीच्या स्वप्नांचा चुराडा झाला. आठवड्यापूर्वी तिच्यावर झालेल्या बलात्काराच्या धक्क्यातून ती अद्याप सावरलेली नाही. अजून ती भेदरलेलीच आहे. भयभीत कुटुंबीय आणि भेटायला येणाऱ्या सहानुभूतीदारांची गर्दी अशी विचित्र परिस्थिती तिच्या घरी आज, रविवारी पाहायला मिळाली.बसर्गे (ता. गडहिंग्लज) हे गडहिंग्लजच्या पूर्वभागातील एक सधन, सुसंस्कृत आणि सामाजिक व राजकीयदृष्ट्या जागरूक असलेले पाच हजार लोकवस्तीचे गाव. अलीकडे काही कुटुंबे शेतवडीत घरे बांधून स्थिरस्थावर झाली आहेत. दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय गावातच आहे. बारावीसाठी हलकर्णीला, तर पदवीसाठी गावातील मुला-मुलींना गडहिंग्लजला जावे लागते.शाळा-कॉलेजच्या मुलांसाठी बसगाड्यांची सुविधा आहे. मात्र, बस वेळेवर नसल्यामुळे बसर्गे-नौकुड मार्गावरील विद्यार्थ्यांना येणेचवंडी फाट्यापर्यंत पायपीट करावी लागते. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेच्या ‘दिव्या’तून तिने गडहिंग्लज येथील एका वरिष्ठ महाविद्यालयात बी.एस्सी. प्रथम वर्ष पदवीसाठी प्रवेश घेतला. तिच्याबरोबर शिकणारे आजूबाजूचे अन्य कुणी नसल्यामुळे ती एकटीच घरापासून ‘बस स्टॉप’पर्यंत ये-जा करायची. कदाचित, त्याचाच गैरफायदा घेऊन ‘पाळत’ ठेवलेल्या ‘नराधमा’ने तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याचा कयास आहे. त्याला त्वरित पकडा, फाशी द्या! अशी तिच्या कुटुंबीयांसह पंचक्रोशीतील जनतेची मागणी आहे.