शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

मित्राला सावरण्यास मित्र धावले... एक नवे आयुष्य फुलले! कोल्हापुरातील सेंट झेविअर्सच्या माजी विद्यार्थ्यांचे नातेबंध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 18:03 IST

फसवणुकीतून वैफल्य आले. मन:स्थिती बिघडली. नोकरीही सोडली. रस्त्यावरील रिकाम्या बाटल्या गोळा करून त्या विकायच्या व मिळेल ते पोटाला खाऊन जगायचे असा दिनक्रम.

विश्वास पाटीलकोल्हापूर : मित्र धावले मित्रांसाठी.. एक नवे आयुष्य फुलले.. असाच अनुभव विवेक चिटणीस (वय ४९, रा. मूळ राजारामपुरी) यांना आला. काही प्रसंगाने त्यांचे आयुष्य पुरते भरकटले होते. रस्त्यावरील रिकाम्या बाटल्या गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या या मित्राच्या मदतीला त्याच्या सेंट झेविअर्स शाळेतील १९८९ च्या बॅचमधील मित्र धावले आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. विजय चिटणीस मंगळवारी सकाळी आयुष्याची नवी सुरुवात सेवेने करण्यासाठी मध्य प्रदेश येथे नर्मदा परक्रिमेला रवाना झाले.चिटणीस या मित्राला निरोप देण्यासाठी रेल्वेस्थानकावर अमर क्षीरसागर, तुषार पाटील, अभिजित भोसले, शिरीष पाटील, प्रदीप मुदलियार, मन्सूर गोवावाला हे जमले होते. त्याला भेटण्यासाठी मुद्दाम अमेरिकेहून अमित देशपांडे आले होते. मित्र चांगला झाल्याचा आनंद व तो सोडून दूर जात असल्याचा अनुभव अशा सुख-दु:खाच्या संमिश्र भावनांनी ते गलबलून गेले.जे घडले, चिटणीस यांच्या वाट्याला आले ते मैत्रीची ताकद सांगणारे, माणुसकीवरील श्रध्दा वाढवणारे आहे. विवेक हे सेंट झेविअर्सचे माजी विद्यार्थी. वर्गात अत्यंत हुशार. त्यांचे आई व भाऊ सध्या अमेरिकेत. विवेक स्वत: कोल्हापुरातील नामांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक होते. चांगलेल सुंदर आयुष्य सुरू होतं; परंतु काही कारणांतून फसवणुकीतून वैफल्य आले. मन:स्थिती बिघडली. नोकरीही सोडली. रस्त्यावरील रिकाम्या बाटल्या गोळा करून त्या विकायच्या व मिळेल ते पोटाला खाऊन जगायचे असा दिनक्रम. १६ जुलैच्या सुमारास रविराज निंबाळकर यांना दाभोळकर कॉर्नरला पाठीवर पोते घेऊन बाटल्या गोळा करताना विवेक आढळले. त्यांना मानसिक आधार दिला व लगेच आधीच नियोजन केल्यानुसार ‘सावली’मध्ये नेऊन दाखल केले. मित्रांनीच त्याच्यासाठी नवे कपडे घेऊन दिले. त्यांच्या तेथील सहा महिन्यांचा देखभालीचा खर्च सर्वांनी उचलला. आठवड्यातून दोन-तीन दिवस सारे मित्र त्यांची तिथे जाऊन ख्याली-खुशाली विचारत होते. डॉ. देवेंद्र होशिंग यांनी त्यांच्या पायाच्या तळव्याची शस्त्रक्रिया केली. ज्यामुळे त्यांना आता नीट चालता येऊ लागले. कपडे, बूट, स्वेटरपासून मोबाइलपर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांना दिली. चार हॉटेलमधील नोकरीच्या ऑफर त्यांच्या हातात होत्या; परंतु त्यांनी त्यास नकार दिला. पुन्हा सांसारिक मोहात न अडकता वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला व डबडबलेल्या डोळ्यांनी सर्व मित्रांचा निरोप घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर