शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळेतील साडेसहा हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:31 IST

कोल्हापूर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानामधून या वर्षी मोफत गणवेश मिळणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी दिली.

ठळक मुद्देमहापालिका शाळेतील साडेसहा हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश३९ लाखांच्या निधीची तरतूद : समग्र शिक्षण अभियानातून तरतूद

कोल्हापूर : महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानामधून या वर्षी मोफत गणवेश मिळणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी दिली.

समग्र शिक्षांतर्गत २०२० आणि २०२१ च्या वार्षिक कार्य योजना आणि अंदाजपत्रकाला केंद्र शासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार महापालिकेच्या पहिली ते आठवीतील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीची मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले अशा एकूण सहा हजार ५२८ विद्यार्थ्यांना मोफत गणवेशचा लाभ मिळणार आहे.या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला २०० रुपयांप्रमाणे दोन गणवेशांकरिता ६०० रुपये अशी एकूण ३९ लाख १७ हजारांची तरतूद केली आहे. ही योजना विद्यार्थी पालक यांना दिलासा देणारी ठरेल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला. गणवेशाचा रंग प्रकार ठरवून गणवेश पुरवठा करण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

शासनाच्या ४ जून २०१९ च्या निर्णयानुसार समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत गणवेश योजनेला थेट लाभ हस्तांतरण (डीपीटी) प्रक्रियेतून कायमस्वरूपी वगळले आहे. त्यामुळे मंजूर निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर लाभार्थ्यांच्या संख्येनुसार वर्ग करण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून गणवेश पुरवठ्याबाबतची संपूर्ण कार्यवाही करण्याचे आदेश आहेत.-रसूल पाटील, कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका

टॅग्स :SchoolशाळाMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर