शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजातील २० हजार युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण, एमकेसीएलच्या सहकार्याने ‘सारथी’ची योजना

By समीर देशपांडे | Updated: March 23, 2023 13:09 IST

व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन तालुका पातळीवर मिळताना अडचणी निर्माण होतात

समीर देशपांडेकोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ संस्थेच्यावतीने मराठा युवक, युवतींसाठी मोफत व्यक्तिमत्त्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्र नॉलेज काॅर्पोरेशन लि. मार्फत हे प्रशिक्षण तालुका स्तरापर्यंत देण्यात येणार आहे.कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ही योजना आखण्यात आली आहे. यातून मराठा, कुणबी, कुणबी/मराठा, मराठा/ कुणबीमधील १८ ते ४५ वयोगटातील उमेदवारांना हे व्यक्तिमत्त्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि तालुका पातळीपर्यंत हे प्रशिक्षण देण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी जवळच्या एमकेसीएलच्या केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेकदा संगणक प्रशिक्षणासाठी तालुका पातळीवर संस्था असल्या तरी व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन तालुका पातळीवर मिळताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ही योजना अनेक युवक, युवतींसाठी लाभदायी ठरणार आहे.

याआधी दहा हजार युवक-युवतींना हे प्रशिक्षण देण्यात येणार होते. परंतु, ते वाढवून आता वीस हजार जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जर आणखी गरज वाटली तर संचालक मंडळ या क्षमतेत वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल. - अशोक पाटील, निबंधक, सारथी, पुणे. 

मराठा समाजातील युवक, युवतींना मूलभूत प्रशिक्षण देणारी ही योजना आहे. एकूणच व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी आणि काळाची गरज असलेल्या संगणकाचे प्रशिक्षण देणाऱ्या या योजनेचा मराठा समाजातील अधिकाधिक युवक-युवतींनी लाभ घ्यावा. - वसंतराव मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, मराठा महासंघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarathaमराठा