शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर महापालिकेच्या शाळांमध्ये मोफत ‘सॅनिटरी नॅपकीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:08 IST

कोल्हापूर : महापालिकेच्या शाळांमधील गरीब, वंचित विद्यार्थिनींना मोफत ‘सॅनिटरी नॅपकीन’ देण्यात येणार आहेत. एका तरुण अभियंत्याने ‘शिबॉक्स’ (रँीुङ्म७) नावाने सुरू केलेल्या या संकल्पनेला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद

ठळक मुद्देमहिनाभरात सोशल मीडियासह विविध माध्यमांतून या उपक्रमासाठी १५ हजार रुपये जमाअनेक गरीब विद्यार्थिनी ‘मासिक पाळी’च्या काळात शाळेला येत नाहीतशिक्षण समितीच्या शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई यांच्यासमोर मांडली

भरत बुटाले ।कोल्हापूर : महापालिकेच्या शाळांमधील गरीब, वंचित विद्यार्थिनींना मोफत ‘सॅनिटरी नॅपकीन’ देण्यात येणार आहेत. एका तरुण अभियंत्याने ‘शिबॉक्स’ (रँीुङ्म७) नावाने सुरू केलेल्या या संकल्पनेला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिनाभरात सोशल मीडियासह विविध माध्यमांतून या उपक्रमासाठी १५ हजार रुपये जमा झाले आहेत. २५ नोव्हेंबर २०१७ या उपक्रमाचा प्रारंभ होत आहे.

गोविंद बळीराम मोघेकर हे मूळचे लातूरचे. त्यांनी कोल्हापुरातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. समाजकार्यात त्यांचा पुढाकार असतो. अनेक गरीब विद्यार्थिनी ‘मासिक पाळी’च्या काळात शाळेला येत नाहीत. त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या विद्यार्थिनींना मोफत ‘सॅनिटरी नॅपकीन’ देण्याची कल्पना मोघेकर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई यांच्यासमोर मांडली. सरदेसाई यांनी तीच कल्पना त्यांच्या सहकाºयांसमोर मांडली. त्याला सर्वांनी मान्यता दिली. या उपक्रमासाठी गोविंद मोघेकर

आणि भाग्यश्री तवर यांनी ६६६.२ँीुङ्म७.्रल्ल या वेबसाईटची निर्मिती केली. वेबसाईट व सोशल मीडियावरून या उपक्रमाला आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. त्या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. महाराष्टÑाबरोबरच देशभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आॅस्ट्रेलियास्थित रेश्मा पाटील यांनीही दोन हजार रुपयांची मदत या उपक्रमासाठी पाठवून दिली आहे. आतापर्यंत १५ हजार रुपये जमा झाले आहेत.कोल्हापूर महापालिकेच्या ५९ शाळा असून, मोफत सॅनिटरी नॅपकीनची आवश्यकता असणाºया २५० वर विद्यार्थिनी आहेत.वर्षभरात लागणाºया सॅनिटरीनॅपकीनसाठी २८ हजारांच्या आसपास निधीची आवश्यकता आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या १५ शाळांना २५ नोव्हेंबर २०१७ या दिवशी नॅपकीनचे वाटप करण्यात येणार आहे.१६ टक्केच महिलांकडून वापरएका सर्व्हेच्या पाहणीतून असे आढळले आहे की, भारतातील केवळ १६ टक्केच महिला ‘सॅनिटरी नॅपकीन’चा वापर करतात. प्रबोधनाच्या अभावामुळे २३ टक्के मुली महिन्यातून ४ ते ५ दिवस शाळेला गैरहजर राहतात.शिक्षक समितीचा पुढाकार विद्यार्थिहिताचे नवोपक्रम राज्याला देणाºया महापालिकेच्या शिक्षकांनी यात आणखी एका संकल्पनेची भर टाकली आहे. यात १५ ते १६ शिक्षिकांचा सहभाग आहे. या शिक्षिका महिला, मुलींमध्ये ‘सॅनिटरी नॅपकीन’बाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

महिला सबलीकरणातून मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने कोल्हापूर महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना सक्षम बनविण्यासाठी सर्व महिला शिक्षकांनी एकत्रित येऊन हा सामूहिक प्रयत्न केला आहे.- उषा सरदेसाई, पर्यवेक्षिका,महापालिकेच्या शिक्षण समिती, कोल्हापूर.मासिक पाळीदरम्यान अधिक रक्तस्राव झाला तरीही तो शोषूण घेण्याची क्षमता सॅनिटरी नॅपकीनमध्ये असते. त्यामुळे कपड्यावर डाग पडत नाहीत आणि कोणतेही इन्फेक्शन होत नाही.- डॉ. बबन पाटीलएम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ, कोल्हापूर

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाOrder orderआदेश केणे