शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पन्हाळगडावर गव्यांचा मुक्तसंचार, पर्यटकांना घडले जवळून दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 12:49 IST

पन्हाळा : पन्हाळ गडाचा साधोबा दर्गा, परिसरात चार गव्यांनी काल, गुरुवारी दिवसभर मुक्तसंचार केला. गव्यांना पाहण्यासाठी पर्यटक व नागरिकांनी ...

पन्हाळा : पन्हाळगडाचा साधोबा दर्गा, परिसरात चार गव्यांनी काल, गुरुवारी दिवसभर मुक्तसंचार केला. गव्यांना पाहण्यासाठी पर्यटक व नागरिकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने गडावर पर्यटकांची संख्या जास्त होती. यातच गवे रस्त्यावरुन फिरु लागल्याने पर्यटकांना गवे जवळुन पाहण्याची संधी मिळाली. तर पन्हाळ्यावरील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.दुपारच्या सुमारास लता मंगेशकर यांच्या बंगल्याकडून साधोबा तलावा जवळील आनंद जगताप यांच्या घराजवळ चार गवे पन्हाळ्यावर आले. गव्यांना पाहण्यासाठी पर्यटकासह नागरिकांनी गर्दी झाली. यावेळी त्यातील एक गवा कुंपणावरुन उडी मारुन मंगळवार पेठच्या दिशेने गेला. बाकीचे तीन गवे विठोबा माळाकडे परत गेले. मंगळवार पेठेकडे गेलेला गवा रात्री परत आला तो वीर शिवा काशिद पुतळ्या खाली मध्यरात्री पर्यंत उभा होता. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आलेच नाहीतलोकांनी आरडाओरडा केल्याने गवे बिथरले व मंगेशकर बंगला परिसरात सैरावैरा धावू लागले. हा प्रकार जवळपास चार, पाच तास सुरू होता. वनविभागाचे या ठिकाणी कोणीही आले नाही. नागरिकांनी गव्यांना रेडेघाट जंगलात हुसकावून लावले. दोन गवे हे पूर्ण वाढ झालेले असल्याचे कांही नागरिकांनी सांगितले. वनविभाग गव्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करत नसल्याने गवे गावात येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभागFortगड