कळंबा : कोंडाळा, ड्रेनेज सफाई यासारखी कामे, वेळेत न होणारा पगार, राहायला घरे नाहीत, अशी सफाई कर्मचाऱ्यांची शोकांतिका आहे. नगरपालिका व महापालिकेतील समस्यांग्रस्त सफाई कामगारांचे ‘एक घर बने हमारा’ स्वप्न आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत पूर्ण होणार आहे. पालिकेच्या मालकीच्या जमिनीवर असणाऱ्या सध्याच्या सेवानिवास स्थळांच्या ठिकाणी यांची निवासस्थाने उभारणे बंधनकार करीत नवीन योजनेच्या निकषांन्वये मोफत सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी ४०० या कमाल चटई क्षेत्र निर्देशांकाच्या मर्यादेत बांधण्यात येणार आहे. संबंधित सदनिका पैकी ५० टक्के सदनिका सेवानिवासस्थाने व उर्वरित ५० टक्के सदनिका या योजनेअंतर्गत सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना अथवा सेवेत असताना मृत झाल्यास पात्र वारसांना मालकी हक्काने मोफत देण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक असून, त्याचा फायदा सफाई कर्मचाऱ्यांचे घराचे स्वप्न पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे. (वार्ताहर)राज्यातील महापालिका, नगरपालिकेतील सफाई कामगारांचे विशिष्ट स्वरूपाचे काम विचारात घेऊन ज्या सफाई कामगारांची सेवा २५ वर्षे किंवा त्याहून अधिक झाली आहे, अशा कामगारांना सेवानिवृत्तीच्यावेळी किंवा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या पात्र वारसांना महापालिका, नगरपालिकेकडून मालकी हक्काने २६९ चौ. फूट चटई क्षेत्राची सदनिका मोफत देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे.
पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे
By admin | Updated: July 3, 2015 00:52 IST