शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

रुग्ण, नातेवाइकाला रोज मोफत भोजन

By admin | Updated: February 15, 2017 00:48 IST

भूकमुक्तीच्या दिशेने : जयसिंगपूर युवा फौंडेशनचा अभिनव उपक्रम

चंद्रकांत कित्तुरे -- कोल्हापूर --पैसे नाहीत म्हणून भजीपाव, वडापाव खाऊन राहणाऱ्या किंवा उपाशिपोटी झोपणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांवर आता असे करण्याची वेळ येणार नाही. कारण रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण आणि त्याचा एक नातेवाईक यांना मोफत भोजन देण्याचा उपक्रम जयसिंगपूर युवा फौंडेशनने एक फेब्रुवारीपासून सुरू केला आहे. हा उपक्रम सध्या जयसिंगपूर शहरातील रुग्णालयांपुरता मर्यादित आहे.विधायक कार्याच्या उद्देशाने जयसिंगूपर शहरातील काही युवकांनी एकत्र येऊन २०१४ मध्ये या फौंडेशनची स्थापना केली आहे. समाजातील निराधार, असहाय आणि गरजूंना आधार देण्याचे कार्य फौंडेशन करीत आहे. जयसिंगूपर शहरात सरकारी, खासगी, सामाजिक संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या रुग्णालयांत दररोज शेकडो रुग्ण उपचार घेत असतात. ते जवळपासच्या खेड्यातून तसेच कर्नाटकातूनही उपचारासाठी जयसिंगपुरात येतात. त्यामध्ये हलाखीची परिस्थिती असलेले अनेक रुग्ण असतात. तसेच गाव लांब असल्याने आणि जवळ पैसा नसल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक केवळ भजीपाव, वडापाव, किंवा काहीतरी खाऊन अर्धपोटी दिवस काढीत असतात. ही बाब जयसिंगपूर युवा फौंडेशनचे अझर पटेल, निखिल कुंभार, अमर पाटील आणि अन्य सदस्यांच्या लक्षात आली. रुग्णालयात अशा अर्धपोटी, उपाशिपोटी, तसेच उघड्यावर झोपणाऱ्या नातेवाइकांसाठी मोफत भोजन आणि अंथरूण-पांघरूण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गरजू रुग्ण आणि त्याचा एक नातेवाईक यांच्यासाठी हा उपक्रम राबविण्याचे ठरले. त्यानुसार फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शहरातील तीसहून अधिक रुग्णालयांशी संपर्क साधून या उपक्रमाची माहिती दिली आणि अशा गरजू रुग्ण आणि नातेवाइकांची माहिती कळविण्याचे आवाहन केले. हळूहळू त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ४५ निराधारांना मोफत भोजनसमाजातील गरीब, वंचित, निराधार, अपंग, वृद्ध, अपत्यहीन, असहायांना भूकमुक्त करण्यासाठी चार एप्रिल २०१५ पासून जयसिंगपूर युवा फौंडेशनने मोफत भोजन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत सध्या दररोज ४५ अशा निराधारांना दोनवेळचे मोफत भोजन दिले जात आहे. शिवाय त्यांची दर महिन्याला आरोग्य तपासणी करून त्यांच्या औषधोपचाराचा खर्चही फौंडशनकडून केला जात आहे. समाजातील दानशुरांच्या मदतीने हा उपक्रम राबविला जातो. कोणताही गाजावाजा न करता एक फेब्रुवारीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या १४ दिवसांत केवळ पाच ते सहा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना याचा लाभ झाला आहे. रुग्णालय आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये याबाबत जागरुकता येईल, तसे याचे प्रमाण वाढेल आणि रुग्णालयांमध्ये कुणालाही अर्धपोटी, उपाशिपोटी किंवा उघड्यावर झोपावे लागणार नाही. -अझर पटेल, सदस्य, जयसिंगपूर युवा फौंडेशन.