शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

दरमहा मोफत तपासण्या... संजीव गोखले यांचा उपक्रम...जनावरांवरील उपचारासाठी अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:49 AM

कोल्हापूर : येथील संजीव गोखले यांनी गोवर्धन व्हेटर्नरी सर्व्हिसेसच्या माध्यमातून जनावरांवर उपचार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे; त्यासाठी अ‍ॅपची निर्मिती करून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत जाऊन पशुपालकाला मार्गदर्शन, जनावरांवर उपचार करणार आहेत. या अ‍ॅपची सुरुवात

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : येथील संजीव गोखले यांनी गोवर्धन व्हेटर्नरी सर्व्हिसेसच्या माध्यमातून जनावरांवर उपचार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे; त्यासाठी अ‍ॅपची निर्मिती करून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत जाऊन पशुपालकाला मार्गदर्शन, जनावरांवर उपचार करणार आहेत. या अ‍ॅपची सुरुवात वैराग (जि. सोलापूर) येथून केली जाणार असून, हळूहळू राज्य व्यापण्याचा मनोदय कंपनीचा आहे.

शेतीमालाच्या अनिश्चित दरामुळे शेती आतबट्ट्यात आल्याने दुय्यम म्हणून पुढे आलेला दुग्ध व्यवसाय प्रमुख बनू लागला आहे; त्यामुळे राज्यात जनावरांची संख्या वाढत आहे; पण पशुसंवर्धनाची यंत्रणा त्या तुलनेत नाही. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा गावपातळीवर असली तरी त्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. एका-एका पशुवैद्यकीय दवाखान्यात १0-१५ वर्षे पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नसल्याने पशुपालकांचे हाल होत आहेत.

पश्चिम महाराष्टत दूध संघांची पशुवैद्यकीय सेवा तशी चांगली आहे; पण उर्वरित महाराष्टÑात फारच बिकट अवस्था आहे. त्यामुळे हा व्यवसायही तोट्यात जात आहे. यासाठी संजीव गोखले यांनी अ‍ॅप विकसित केला आहे. यामध्ये राज्यातील पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांची टीम केली आहे. या टीमने १२ वी पास मुलांना प्रशिक्षण दिले. ही मुले अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी करणार आहेत. प्रत्येक जनावरांमागे २00 रुपये फी आकारणार आहे. ५00 जनावरांमागे एक प्रशिक्षित व्यक्ती नोंदणीकृत शेतकºयाची मागणी असो अथवा नसो, दर महिन्याला त्याच्या जनावरांच्या सर्व तपासण्या विनामूल्य करेल. थेट औषध कंपन्या जोडल्या जाणार असल्याने अल्पदरात किमान २० टक्के कमी दराने औषधेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.दुग्धविकास विभाग अनुकूलगोखले यांनी दुग्धविकास सचिवांपुढे याचे सादरीकरण केले. दूध उत्पादकांच्यादृष्टीने खूपच नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. तीन महिन्यांतील यश पाहून सरकार आर्थिक पाठबळ देण्यास अनुकूल असल्याचे सचिवांनी सांगितले. कृत्रिम रेतन ते प्रसूतीपर्यंत उत्पादकांना सेवा दिली, तर प्रत्येक जनावरासाठी वर्षाला६00 रुपये अनुदान देण्याची तयारी सचिवांनी दाखविली आहे.‘पोर्टल’वर जनावरांची संपूर्ण कुंडलीजनावरांची नोंदणी केली, की त्याची पहिल्या दिवसापासून तपासण्या व उपचार कायकेले, याची संपूर्ण माहिती पोर्टलवर एकत्रित होणार आहे. शेतकºयाने जनावरांची विक्री केली, तर नवीन पशुपालकाला संबंधित जनावरांचा क्रमांक पोर्टलवर टाकल्यास संपूर्ण कुंडलीच मिळणार आहे.रक्त, लघवीच्या १४ तपासण्या !माणूस आजारी पडला की, प्रथम त्याच्या रक्त, लघवीच्या तपासण्या केल्या जातात. त्याप्रमाणे जनावरांच्या दर महिन्याला रक्त, लघवीच्या विविध प्रकारच्या १४ तपासण्या केल्या जाणार आहेत.या देणार सुविधाकृत्रिम रेतन ते प्रसूती पर्यंत मार्गदर्शन व उपचारनाक, कान, घशाची इंडोस्कोपीरक्त, लघवीच्या १४ तपासण्या करणारवैरण, पशुखाद्य वापरण्याबाबत मार्गदर्शनसवलतीच्या दरात औषधे 

दूध उत्पादकांसमोर भाकडकाळ ही मोठी समस्या असून, त्यासह जनावरांच्या इतर आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे अ‍ॅप तयार केले. उत्पादकाला अत्यल्प पैशात गोठ्यात आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्नआहे. - संजीव गोखले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMedicalवैद्यकीय