शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

करवीरच्या तत्कालीन तहसिलदारांसह सतरा जणांवर फसवणूकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:46 IST

बालिंगा (ता. करवीर) येथील जमीन गट नंबर २३७ जमीनीचे मयताच्या नावे असलेल्या बनावट वटमुखत्यारपत्राचे आधारे दस्त नोंदवून जागेचे सहा हिस्से करुन फसवणूक केल्याप्रकरणी करवीरच्या दोघा तत्कालीन तहसिलदारांसह सतरा जणांवर करवीर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देकरवीरच्या तत्कालीन तहसिलदारांसह सतरा जणांवर फसवणूकीचा गुन्हाबालिंगा येथील जागेचे बनावट कागदपत्रांद्वारे पोटहिस्से

कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील जमीन गट नंबर २३७ जमीनीचे मयताच्या नावे असलेल्या बनावट वटमुखत्यारपत्राचे आधारे दस्त नोंदवून जागेचे सहा हिस्से करुन फसवणूक केल्याप्रकरणी करवीरच्या दोघा तत्कालीन तहसिलदारांसह सतरा जणांवर करवीर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला.संशयित तहसलिदार योगेश भिमराव खरमाटे, उत्तम विठ्ठल दिघे, मंडल अधिकारी शंकर एन. नांगरे, तलाठी शरद मारुती नलवडे, भुमी अभिलेख उपअधीक्षक पल्लवी शिरकोळे, जिनगोंडा यशवंत पाटील, आशा जिनगोंडा पाटील, मुवर रशिद पठाण (रा. सांगली वेश इचलकरंजी), वैष्णवी हरीष राणे, संजय शिवाजीराव पवार (रा. राजारामपूरी), प्रदीप पांडुरंग इंगवले (शिवाजी पेठ), उमेश राजाराम झंजे (कावणे, ता. करवीर), सरिता दिनकर माने (जरगनगर), इंद्रजित बाबुराव पाटील, बाबुराव सिताराम पाटील (दोघे रा. कळंबा, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.अधिक माहिती अशी, फिर्यादी शांताराम श्रीपती माळी (रा. बालिंगा) यांच्या मालकीची गट नंबर २३७ मध्ये जमीन आहे. संशयितांनी सहहिस्सेदार मृत रामचंद्र बाबु माळी यांचे नावे असलेल्या बनावट वटमुखत्यारपत्राचे आधारे दस्त नोंदविला. त्यानंतर बनावट गुंठेवारी आदेशाचा वापर करुन ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या खोट्या सह्या करुन गुंठेवारी आदेशाप्रमाणे मोजणी करुन जागेचे सहा पोट हिस्से करुन घेतले.

आपल्या मालकीच्या जागेची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माळी यांनी जिल्हा न्यायालयात संशयितांच्या विरोधात याचिका दाखल केली. न्यायालयाने करवीर पोलीसांना यासंबधी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत.

सध्या संशयित उत्तम दिघे हे वर्धा येथे उपजिल्हाधिकारी तर योगेश खरमाटे हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदारपदी कार्यरत आहेत. वरीष्ठ शासकीय अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाल्याने महसुल विभागात खळबळ उडाली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर