शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

कापड खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक

By admin | Updated: October 18, 2015 23:43 IST

इचलकरंजीतील वस्त्रोद्योगात खळबळ : कोट्यवधी रुपयांची फसवणूक; कापड उत्पादक यंत्रमागधारक अस्वस्थ

राजाराम पाटील-इचलकरंजीकापड खरेदी-विक्रीच्या व्यवहारात यंत्रमागधारक व व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढू लागल्याने येथील वस्त्रोद्योगात खळबळ माजली आहे. आधीच मंदीमुळे आर्थिक फटका बसत असल्याने यंत्रमागधारक आणखीनच त्रस्त झाला आहे. देशातील एकूण यंत्रमागांपैकी निम्म्याहून अधिक यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. शेतीखालोखाल असलेल्या या वस्त्रोद्योगात होणाऱ्या तेजी-मंदीचा परिणाम येथे अधिक जाणवतो. गुजरात राज्यातही बऱ्यापैकी वस्त्रोद्योग आहे. त्यामुळे गुजरातमधून निवडून गेलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे वस्त्रोद्योगाला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती; पण गेले वर्ष वस्त्रोद्योगाला काही चांगले गेले नाही. आर्थिक मंदीच्या फेऱ्यात हा उद्योग सापडला आहे.अशा परिस्थितीत यंत्रमाग कामगारांच्या सुधारित किमान वेतनाच्या मागणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगारांचा ३१ जुलैला सुरू झालेला संप ५२ दिवस चालला. त्या काळात इचलकरंजीतील सुमारे ४५०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली. यामुळे येथील आर्थिक घडी विस्कटली. त्यानंतर सायझिंग कारखाने सुरू झाले; पण अवघ्या दोन आठवड्यांतच पुन्हा मंदीची तीव्रता जाणवू लागली. सध्या इचलकरंजीतील सायझिंग कारखाने आठवड्यातील तीन दिवस बंद राहत आहेत. म्हणजे शहरातील ३५ टक्के कापड उत्पादन घटले आहे.वस्त्रोद्योगातील कमालीच्या मंदीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक तंगी जाणवत असताना येथील काही यंत्रमागधारक व व्यापाऱ्यांना दिल्ली येथील एका फर्मने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. प्रथम विश्वास संपादन करून त्यानंतर मोठ्या प्रमाणात कापड माल घेत पेमेंट न देण्याची पद्धत यावेळीही अवलंबली गेली. त्याचप्रमाणे शहरातील विरार-मुंबई येथील मोदी नावाच्या तथाकथित कापड व्यापाऱ्याने गेले दीड वर्ष शर्टिंग-शूटिंग, ड्रेस मटेरियल अशा विविध प्रकारच्या कापडाची खरेदी केली. त्याचे पेमेंटही दिले; पण आता शहरातील ११ कापड व्यापाऱ्यांकडून व दोन-तीन यंत्रमागधारकांकडून सात कोटी रुपयांच्या खरेदी केलेल्या कापडाचे पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या या प्रकरणाची व्याप्ती वाढू लागल्याने येथील वस्त्रोद्योगामध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. सतत सावधगिरीची आवश्यकता : कोष्टीपरपेठांतील कापड व्यापारी फर्मकडून होणाऱ्या फसवणुकीबाबत बोलताना इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी म्हणाले, कापड खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नेहमीच सावधगिरी बाळगली पाहिजे. त्याचप्रमाणे पोलिसांनीसुद्धा परपेठांमधून होणाऱ्या व्यापाऱ्यांकडून फसवेगिरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यास जलद हालचाली करून संबंधितांवर कडक कारवाई केली पाहिजे, ज्यामुळे इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाबाबत व्यापार व्यवसायासाठी चांगली प्रतिमा तयार होण्याबरोबरच गैरवर्तनासाठी येथील पोलिसांचा वचकही गुन्हेगारांवर निर्माण होईल.दीपावलीनंतर वस्त्रोद्योगात सुधारणा : महाजनदीपावलीनंतर वस्त्रोद्योगातील कापडाची मागणी वाढेल. व्यापार व्यवसाय सुधारण्याची संधी असल्याची माहिती यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी सांगितली. ते म्हणाले, यंत्रमाग उद्योगामधील वाढीव वीजदराचा फटका यंत्रमागधारकांना बसला आहे. त्यामुळे आणि मंदीच्या वातावरणामुळे कापड उत्पादनात सुमारे तीस टक्के घट झाली आहे. आॅटोलूम कारखानदारांचा जॉबरेटसुद्धा प्रतिमीटर दहा ते अकरा पैशांवर आल्यामुळे नुकसान होऊ लागले आहे. मात्र, डिसेंबरपासून कापड उद्योगामध्ये चांगले दिवस येण्याची आशा आहे.