शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चौवीस तास नाकाबंदी, वाहनांची कसून तपासणी-बनावट नोटा, देशी-विदेशी मद्य, हत्यारे तस्करींवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 12:41 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट चलनी नोटा, देशी-विदेशी मद्य व हत्यारे, आदींची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

ठळक मुद्देमहिलेला मारहाण --न्यायालय परिसरात धक्काबुक्की--तीन दूचाकी चोरी

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट चलनी नोटा, देशी-विदेशी मद्य व हत्यारे, आदींची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नाक्यासह चौका-चौकांत चौवीस तास कडक नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. प्रत्येक नाक्यावर व चौकात पोलिसांचे पथक खडा पहारा देत आहे.

लोकसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने जिल्'ात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार शहरातील शिरोली, तावडे हॉटेल, कावळा नाका, शाहू नाका, शिवाजी पूल, शिये, कसबा बावडा, दसरा चौक, कळंबा नाका, वाशी नाका, सायबर चौक, फुलेवाडी, उमा टॉकीज, गंगावेश, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, माउलीचा पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक, आदी ठिकाणी पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. लायसेन्स, वाहनांची कागदपत्रेतसेच वाहनातील प्रत्येक बॅगेची कसून तपासणी केली जात आहे. त्या वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींची नावेही नोंद केली जात आहेत. हत्यारे, मद्याची तस्करी, बनावट नोटा मिळून आल्यास जाग्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

महिलेला मारहाणकोल्हापूर : सत्य प्रकाश सेवा मंडळ टिंबर मार्केट येथे किरकोळ वादातून महिलेच्या डोक्यात स्टिलचा ग्लॉस मारुन जखमी केले. शोभा गणपत लोखंडे (वय ३६, रा. गवत मंडई, टिंबर मार्केट) या जखमी झाल्या. त्यांनी संशयित विद्या दिपक कांबळे हिला तुझा भाऊ पिंटू माझ्या मुलीला त्रास देतो, त्याला ताकीद दिली आहे असे सांगत असताना रागाने स्टिलचा ग्लॉस फेकून मारला. जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.न्यायालय परिसरात धक्काबुक्कीकोल्हापूर : कौटूंबिक न्यायालय परिसरात मुलीच्या भेटीवरुन वाद होवून वृध्द दाम्पत्यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघा भावांवर लक्ष्मीपूरी पोलीसांत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित सत्वशिल बाळासाहेब जाचक (वय ४२), त्याचा भाऊ संग्राम (४०, दोघे रा. अशोकनगर, भिगवन रोड, बारामती) अशी त्यांची नावे आहेत. फिर्यादी जगन्नाथ बाबुराव पाटणकर (७२, रा. नलवडे कॉलनी, सम्राटनगर) हे पत्नी मंगल असे मिळून कौटूंबिक न्यायालयात तारीख असल्याने मंगळवारी आले होते. यावेळी संशयितांनी त्यांना पाहून मुलीची भेट देत नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणून शिवीगाळ करुन पाटणकर दाम्पत्यास धककाबुक्की केली. यावेळी जगन्नाथ पाटणकर यांच्या उजव्या हातावर कटरने वार केला.तीन दूचाकी चोरीकोल्हापूर : रावणेश्वर मंदीर समोर शिवाजी स्टेडीयम आणि शाहु कलॉथ मार्केट येथे पार्किग केलेल्या तीन दूचाकी चोरट्याने लंपास केल्या. याप्रकरणी हिमतखान महम्मद हनीफ पठाण (५३, रा. नळभाग, सांगली), प्रकाश रामचंद्र माने (७०, रा. वारणा कॉलनी, कोल्हापूर), दत्ता लक्ष्मण शारबिद्रे (३०, रा. यादवनगर) यांनी लक्ष्मीपूरी व जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी