कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्यात रविवारी सूर्याची किरणे सायंकाळी ५ वाजून ४८ मिनिटांनी देवीच्या कमरेच्या वर पोहोचली. दरम्यान, ढगाळ वातावरण आणि किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला नाही, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्पष्ट केले.किरणोत्सवाच्या चौथ्या दिवशी रविवारी ‘याची देही, याची डोळा’ हा सोहळा पाहण्यासाठी स्थानिकांसह परराज्यांतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सलग सुट्यांमुळे भाविकांची संख्या मोठी होती. मावळतीची किरणे सायंकाळी ५ वाजून १६ मिनिटांनी मंदिरात अवतरली. त्यावेळी सुर्य किरणांची तीव्रता चांगली होती. त्यामुळे पूर्णक्षमतेने किरणोत्सव होईल अशी आशा भाविकांना, अभ्यासकांना होती. ५ वाजून ४६ मिनिटे ते ५ वाजून ४८ मिनिटांपर्यंत किरणे देवीच्या गुडघ्यांवरून कमरेपर्यंत पोहोचली.त्यानंतर ती कमरेवरून डाव्या बाजूला सरकत लुप्त झाली. या दरम्यान किरणांच्यामध्ये ढगांचा अडथळा आल्याने किरणोत्सवपूर्ण क्षमतेने झाला नाही.
चौथ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या कमरेच्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 01:01 IST