शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

चार हजार शेतकरी अनुदानाला मुकले ठिबक सिंचनचा घोळ : फॉर्ममधील चुका भोवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:50 IST

नसिम सनदी । कोल्हापूर : केवळ फॉर्म भरताना चुका झाल्या म्हणून मागणी केलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना ठिबकच्या अनुदानाला मुकावे ...

ठळक मुद्देपाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून शासनाने ठिबकला झुकते माप दिलेकोणतेच अधिकार जिल्हा पातळीवर नसल्याने राज्यस्तरावर एकत्रित याद्या करताना अपात्र अर्जांचे प्रमाण वाढले.

नसिम सनदी ।कोल्हापूर : केवळ फॉर्म भरताना चुका झाल्या म्हणून मागणी केलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना ठिबकच्या अनुदानाला मुकावे लागले आहे. जिल्ह्णातून ७ हजार ४४७ शेतकºयांनी अर्ज केले होेते, त्यांपैकी ३ हजार ६१३ शेतकºयांनाच प्रत्यक्ष अनुदानाचा लाभ झाला असून, तब्बल ३ हजार ८६१ अर्ज बाद ठरले आहेत.या शेतकºयांना १0 कोटी ४३ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या रकमेतील शेवटचा ६१ लाखांचा हप्ताही कृषी विभागाकडे आला असून, तो लवकरच शेतकºयांच्या खात्यावर वर्ग होत आहे. ठिबक सिंचनच्या अनुदानाचा आॅनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती शेतकºयांना कृषी विभागाने देण्याची गरज आहे.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून शासनाने ठिबकला झुकते माप दिले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून केंद्र ६० टक्के व राज्य ४० टक्के असा अनुदानाचा टक्का ठरवून ३५ टक्के अनुदानावर शेतकºयांना ठिबक संच पुरवण्यास सुरुवात झाली.

अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याबरोबरच आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राबवली. २०१७-१८ या आर्थिक वर्षात या पद्धतीने फॉर्म भरून घेतले. यात कोल्हापूर जिल्ह्णातील ७ हजार ४७४ शेतकºयांनी अर्ज भरले. हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर या तालुक्यांतील शेतकºयांचा भरणा जास्त होता.अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली; पण त्यात मोठ्या प्रमाणावर चुका झाल्याने आणि त्यात सुधारणा करण्याचे कोणतेच अधिकार जिल्हा पातळीवर नसल्याने राज्यस्तरावर एकत्रित याद्या करताना अपात्र अर्जांचे प्रमाण वाढले.

बहुतांश शेतकरी डिलरकडूनच अर्ज भरून घेतात. अर्ज इंग्लिशमध्ये असल्याने नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका राहतात. त्या अन्य ओळखीच्या पुराव्याशी जुळत नाहीत. शिवाय अर्धवट अर्ज भरले जातात. संच बसवण्याआधीच अर्ज भरण्याची घाई केली जाते. २० गुंठ्यांच्या आत अनुदान मिळत नसतानाही अर्ज भरले जातात. या सर्व अज्ञानपणामुळे प्रत्यक्षातील अर्ज आणि अनुदानप्राप्त शेतकरी यांच्या संख्येत निम्म्यापेक्षा अधिक तफावत दिसत आहे.नव्या वर्षात ६०० अर्जमोठ्या प्रमाणावर अर्ज बाद झाल्याने आॅनलाईन अचूक फॉर्म भरण्याविषयी माहिती देण्याची गरज आहे. यावर्षी नोव्हेंबरपासून ही प्रक्रिया अधिक गती घेणार आहेत. आतापर्यंत ६०० शेतकºयांनी अर्ज केले आहेत. मार्चपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार आहे. शेतकºयांनी अचूक अर्ज भरावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.तालुका प्रस्ताव अनुदानप्राप्तसंख्या शेतकरीआजरा ३0१ १0१भुदरगड १५६ २४चंदगड २२७ ३५गडहिंग्लज ५२४ २३८गगनबावडा ६८ ३४हातकणंगले १९४४ ९६२कागल १0४३ ५२४करवीर १0३९ ५३८पन्हाळा ३८५ १८३राधानगरी १३१ ३८शाहूवाडी ११७ ५0शिरोळ १५३९ ८८६

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर