शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महानगरपालिकेतील ड्रेनेज घोटाळ्यात चौघे निलंबित; पुढील कारवाई कधी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:41 IST

चौकशी समिती अहवालासह तांत्रिक अहवालदेखील प्रशासकांना सादर

कोल्हापूर : महानगरपालिकेतील गाजत असलेल्या कसबा बावडा येथील ड्रेनेज घोटाळ्यातील चौघा दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित केले असले तरी पुढील कारवाई मात्र थांबली आहे. चौकशी समितीने अहवाल देऊन आठ दिवस झाल्यानंतरही चौघांवरच ही कारवाई थांबते की काय, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. दरम्यान, संगणकीय प्रणालीवर बिल मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचे लॉगिन वापरल्याचा सुस्पष्ट अहवाल संगणक विभागाकडून प्रशासकांना देण्यात आल्याचे सांगण्यात येते.कसबा बावडा येथील ड्रेनेजलाइनचे काम न करताच ८५ लाखांचे बिल उचलून ठेकेदार श्रीप्रसाद वराळे याने महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांनी केला होता. त्यानंतर ठेकेदार वराळे यांनी महापालिकेचे बिल मंजूर करण्याकरिता कोणत्या अधिकाऱ्याला किती रुपये दिले याचा गौप्यस्फोट करून या प्रकरणाला वेगळेच वळण दिले. त्यामुळे संपूर्ण महापालिका प्रशासन हादरून गेले. यादरम्यान प्रशासक के. मंजुलक्ष्मी बाहेरगावी असल्याने अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी संबंधितांना नोटीस देऊन खुलासे मागितले होते.ठेकेदाराने जोडलेली एम. बी. खोटी असल्याचा दावा कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांनी केला होता, तर त्यांच्यासह उपशहर अभियंता रमेश कांबळे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी आपल्या सह्यादेखील खोट्या असल्याचा दावा केला होता; परंतु सह्या खोट्या असल्या तरी संगणकीय प्रणालीद्वारे जे बिल प्रत्येक अधिकाऱ्यांच्या लॉगिनमधून पुढे सरकले आहे. वैयक्तिक पासवर्ड वापरला गेला आहे. अधिकाऱ्यांनी सह्या खोट्या असल्याचा दावा केला असला, तरी संगणकीय प्रणालीवरून बिल पुढे सरकले कसे, असा प्रश्न समोर आला आहे.ड्रेनेजच्या कामात घोटाळा झाल्याची बाब समोर येताच प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी प्रथमदर्शनी समोर आलेल्या पुराव्यावरून ठेकेदार वराळेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला, तर प्रज्ञा गायकवाड, सहायक अधीक्षक बळवंत सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे, पहारेकरी कुणाल पोवार, अशा चौघांना निलंबित केले.अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांनी चौकशी अहवाल देऊन आठवडा होऊन गेला. संगणक विभागाचे प्रमुख यशपालसिंग रजपूत यांना तांत्रिक अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. त्यांनीही त्यांचा अहवाल प्रशासकाकडे सादर केला आहे. वराळे यांचे बिल अदा करण्यासाठी अनेकांच्या लॉगिनमधून बिल पुढे धनादेश काढण्यासाठी गेल्याचे तांत्रिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. मग झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई कधी होणार, असा सवाल महापालिका वर्तुळातून उपस्थित केला जाऊ लागला आहे.