शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

Kolhapur News: महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या अचानक रद्द; प्रवाशांची गैरसोय 

By संदीप आडनाईक | Updated: August 12, 2023 17:47 IST

अनेकांना सहलीचा बेत रद्द करावा लागला तर काहींना खासगी बसच्या वाढीव तिकिटांचा भुर्दंड सहन करावा लागला

कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनाला जोडून येणाऱ्या सलग सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गर्दी असतानाच महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या अचानक रद्द केल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. यामुळे सहलीच्या बेतावर विरजण पडले आहे. अनेकांना सहलीचा बेत रद्द करावा लागला तर काहींना खासगी बसच्या वाढीव तिकिटांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे.कोल्हापुरातून आज, शनिवार दि. १२ ऑगस्ट आणि सोमवार, दि. १४ ऑगस्ट रोजी जाणारी आणि गोंदियातून सोमवार, दि. १४ आणि बुधवार, दि. १६ रोजी येणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वे रद्द केल्याने या रेल्वेतून येणाऱ्या सुमारे १२०० प्रवाशांना याचा फटका बसला. आज, शनिवारी ही गाडी जेव्हा कोल्हापूर रेल्वे स्थानकावर आली तेव्हा सुट्टीवर आलेल्या प्रवाशांची मोठी गर्दी होती.भुसावळ विभागातील जळगाव-भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे तसेच यार्ड पुनर्दुरुस्तीचे तांत्रिक काम केले जाणार आहे, म्हणून या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांवर याचा परिणाम झाला. यामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या जाणाऱ्या दोन आणि येणाऱ्या दोन अशा चार फेऱ्या रद्द केल्यामुळे अनेक प्रवाशांना याचा भुर्दंड बसला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे