शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या  रिक्षाला कारची धडक, चार शाळकरी विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 13:48 IST

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या  रिक्षाला रुईकर कॉलनी येथे कारची धडक लागल्याने रिक्षा उलटून रिक्षाचालक आणि चार विद्यार्थी असे एकूण पाच जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ९ वाजून वीस मिनिटांनी झाला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने कारचालकाला बेदम मारहाण करीत कारचा चक्काचूर केला.

ठळक मुद्देजमावाने कारचा केला चक्काचुर विद्यार्थी उपचारासाठी रुग्णालयात

कोल्हापूर, दि. ९ : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या  रिक्षाला रुईकर कॉलनी येथे कारची धडक लागल्याने रिक्षा उलटून रिक्षाचालक आणि चार विद्यार्थी असे एकूण पाच जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ९ वाजून वीस मिनिटांनी झाला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने कारचालकाला बेदम मारहाण करीत कारचा चक्काचूर केला.या प्रकारामुळे संतप्त जमावाने कारचालक रणजित लक्ष्मण माळवी (वय ३० रा. चंदे्र, ता. राधानगरी) मारहाण केल्याने जखमी झाला. हा घटना समजताच शाहूपुरी पोलिस व वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी कारचालकाला जमावातून बाहेर काढले तर जखमी रिक्षाचालक सागर एकनाथ बाबर तसेच सदरबझार येथील कोरगांवकर हायस्कुलच्या चार विद्यार्थ्यांना कदमवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.जखमी कारचालक रणजित माळवी याच्यावर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शाहूपुरी पोलिसांकडून या अपघाताची माहिती घेण्याचे काम सुरु होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.घटनास्थळावरुन आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालक सागर बाबर हे गुरुवारी सकाळी कोरगांवकर हायस्कुलसह अन्य शाळेचे आठ विद्यार्थी रिक्षामधून (क्रमांक एमएच 0९ सीडब्ल्यू २९४) नेत होते. ही रिक्षा रुईकर कॉलनी येथे आल्यावर शिवाजी तरुण मंडळाच्यासमोरील वळणावर एमएच 0९ डी. एम. ४४८८ या कारची या रिक्षाला धडक लागली.

यात रिक्षा उलटून चार विद्यार्थी जखमी झाले. हा प्रकार समजताच घटनास्थळी जमा झालेल्या परिसरातील नागरिकांच्या जमावाने कारचालक संशयित रणजित माळवी याला बेदम मारहाण केली, तसेच कारची तोडफोड केली.या अपघाताचे वृत्त समजताच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ आणि शाहपूरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

त्यांनी जमावाला पांगवून कारचालकाची सुटका केली तर जखमी रिक्षाचालक सागर एकनाथ बाबर आणि जखमी विद्यार्थी सिद्धीका परशुराम कोचीकोरवी (वय ५ ), विनायक मनिष कोचीकोरवी (५), पार्थ वसंत कोचीकोरवी व विद्या महेश कोचीकोरवी (सर्व रा. कावळा नाका परिसर) या जखमींना येथील रहिवासी रमेश पाटील, शाम नायर, विकी आंबरे आदींनी बाहेर काढले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात