शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांचा पाऊस दोन तासांत; करवीरमध्ये आभाळच फाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:12 IST

मंगळवारची रात्र जिल्ह्यातील करवीर, कागल, पन्हाळा, राधानगरी या तालुक्यांसाठी वैऱ्याची ठरली. करवीरमध्ये तर आभाळच फाटले. अवघ्या दोन-तीन तासांत तब्बल ४८२ मिलिमीटर पाऊस पडला.

ठळक मुद्देचार दिवसांचा पाऊस दोन तासांत; करवीरमध्ये आभाळच फाटले, दोन तासांत ४८२ मि.मी. पाऊसएकट्या पन्हाळा सर्कलमध्ये १४० मि.मी. पावसाची नोंद : निसर्गाच्या रुद्रावताराचा अनुभव

कोल्हापूर : मंगळवारची रात्र जिल्ह्यातील करवीर, कागल, पन्हाळा, राधानगरी या तालुक्यांसाठी वैऱ्याची ठरली. करवीरमध्ये तर आभाळच फाटले. अवघ्या दोन-तीन तासांत तब्बल ४८२ मिलिमीटर पाऊस पडला.

सर्कलनिहाय पाऊस पाहिला तर एकट्या पन्हाळा सर्कलमध्ये सर्वाधिक १४० मि.मी. पाऊस नोंदवला गेला. प्रचंड विध्वंस करून गेलेल्या या तुफानी पावसाने नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकविला. चार दिवसांचा पाऊस काही तासांत कोसळल्याने अनेकांनी निसर्गाच्या रुद्रावताराचा विदारक अनुभव घेतला.तालुकानिहाय पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने मंगळवारी अक्षरश: धिंगाणा घातला. दोन-तीन तासांत २६४ मि.मी. पाऊस नोंदवला गेला. त्यात सर्वाधिक ५० मि.मी. पाऊस कागल तालुक्यात, ४७ मि.मी. राधानगरीत, ४३ मि.मी. करवीरमध्ये, ४१ मि.मी. पन्हाळ्यात असा पाऊस नोंदवला गेला. भुदरगडमध्ये २२ मि.मी. वगळता उर्वरित जिल्ह्यात पावसाचा फारसा जोर नव्हता.चार तालुक्यांतील ३१ सर्कल सर्वाधिक पावसाचेपाऊस मोजण्यासाठी जिल्ह्यात ७६ सर्कल करण्यात आले आहेत. त्यात सर्कलनिहाय तालुक्यातील पाऊस पाहिला तर चार दिवसांचा पाऊस काही तासांत झाला आहे. करवीर सर्कलमधील ११ गावांमध्ये ४८२ मि.मि. कागल सर्कलमधीलसात गावांमध्ये ३५४ मि.मी. पन्हाळा सर्कलमधील सात गावांमध्ये २८७ मि.मि. राधानगरी सर्कलमधील ६ गावामध्ये २८६ पाऊस झाला आहे. ७६ सर्कलपैकी चार तालुक्यांतील ३१ सर्कलमधील गावांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.सर्वाधिक पावसाचे गावनिहाय सर्कल (मि.मी.मध्ये)पन्हाळा १४०, राधानगरी ९८, बालिंगे ९, मुरगूड ९४, सांगरूळ ७९, खडकेवाडा ७०, राशिवडे ६८, करवीर ६६, बिद्री ५८, आवळी ५७, इस्पुर्ली ५५, कागल ४९, कणेरी ४८, हळदी ४२, वडगाव ३८, गारगोटी ३८, कसबा तारळे ३७, कोडोली ३५, सिद्धनेर्ली २९, केनवडे २९, कोतोली २७, निगवे २७, वाडी रत्नागिरी २६, कापशी २५, उत्तूर २२, पिंपळगाव २२, कारवडवाडी २२, शिरोली दुमाला २१.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर