शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: जयसिंगपुरातील तरुणाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक, दोघे फरार; ऐन दिवाळीत खून झाल्याने उडाली होती खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:16 IST

आरोपींनी दिली खुनाची कबुली

जयसिंगपूर : ऐन दिवाळीत लक्ष्मी पुजनादिवशीच पूर्व वैमनस्यातून तरुणाचा धारदार चाकूने वार करून खून झाल्याची घटना जयसिंगपुरात घडली होती. सुनील किसन पाथरवट (वय ३१) असे मृताचे नाव असून खूनप्रकरणी सहा जणाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून यातील चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.शेखर महादेव पाथरवट (वय-३०), सागर परशुराम कलकुटगी (३१) ला बसवाना खिंड, तमदलगे परिसरातून तर विजय लक्ष्मण पाथरवट (४३), संजय लक्ष्मण पाथरवट (४७) यांना चौंडेश्वरी फाटा परिसरातून अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींना न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर रोहीत पाथरवट व शिवानंद पाथरवट हे दोघे संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.पूर्व वैमस्यातील राग डोक्यात ठेवून मंगळवारी लक्ष्मी पुजन झाल्यानंतर मध्यरात्री जुन्या वादातून सुनिलला लाथाबुक्यांनी मारहाण करत चाकुने सपासप वार करून गंभीर जखमी केल. सुनिलला सांगली सिव्हील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी विशाल शिवाजी पवार यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी खुनाची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Four arrested, two absconding in Jaysingpur murder case on Diwali.

Web Summary : In Jaysingpur, a young man was murdered due to prior animosity on Diwali. Police arrested four individuals. Two suspects are still at large, investigation ongoing.