शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पक्षिगणनेत रंकाळ्यावर ७४ प्रजातींच्या ९५२ पक्ष्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 16:59 IST

‘बर्डस आॅफ कोल्हापूर’ या फेसबुक ग्रुपकडून कोल्हापूरच्या वेगवेगळ्या भागांतील पक्ष्यांची गणना करणे सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या टप्प्यात कोल्हापुरातील रंकाळा तलावावरील केलेल्या पक्ष्यांच्या गणनेत ७४ प्रजातींचे ९५२ पक्षी नोंदले गेले.

ठळक मुद्देपक्षिगणनेत रंकाळ्यावर ७४ प्रजातींच्या ९५२ पक्ष्यांची नोंदस्थलांतरित १५ प्रजाती : स्थानिक चार प्रजातींचा समावेश

कोल्हापूर : ‘बर्डस आॅफ कोल्हापूर’ या फेसबुक ग्रुपकडून कोल्हापूरच्या वेगवेगळ्या भागांतील पक्ष्यांची गणना करणे सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या टप्प्यात कोल्हापुरातील रंकाळा तलावावरील केलेल्या पक्ष्यांच्या गणनेत ७४ प्रजातींचे ९५२ पक्षी नोंदले गेले.कळंबा तलाव आणि शिवाजी विद्यापीठ परिसरानंतर पक्षिगणनेच्या मालिकेतील तिसऱ्या टप्प्यातील गणना रंकाळा तलावावर करण्यात आली. या गणनेत स्थलांतरित पक्ष्यांच्या १५ प्रजाती होत्या, तर ४ प्रजाती या स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांच्या होत्या.

चित्रबलाक, काळ्या डोक्याचा शराटी, नदी सुरय या तिसऱ्या टप्प्यातील गणनेत मोजल्या गेलेल्या पक्षीप्रजाती या आययूसीएन (इंटरनॅशनल यूनियन फॉर कॉन्झर्वेशन आॅफ नेचर) जागतिक संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत टाकलेल्या ‘संकटग्रस्त’ पक्षीप्रजाती आहेत.यावेळी थापट्या बदक, वेळूतला दंगेखोर वटवट्या, युरेशियन दलदल हरीण, तपकिरी खाटीक, धूसर पांगळी, नदी सुरय, ठिपकेवाली तुतारी या पक्ष्यांच्या काही प्रजातींची नोंद झाली.कोल्हापूर शहराबरोबरच गारगोटी, गडहिंग्लज येथून आलेल्या ८६ पक्षिप्रेमींनी या गणनेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. सुहास वायंगणकर, फारुख म्हेतर, रमन कुलकर्णी, स्वप्निल पवार, आशिष कांबळे, कृतार्थ मिरजकर, दिलीप पाटील, मधुकर धर्माधिकारी आणि अमित कारंडे या निसर्गतज्ज्ञांनी या गणनेत मार्गदर्शन केले.

प्रणव देसाई आणि सत्पाल गंगलमाले यांनी या पक्षिगणनेच्या मालिकेचे संयोजन केले आहे. या मालिकेतील पुढील गणना राजाराम तलावावर रविवार, दि. १२ जानेवारी रोजी सकाळी होणार आहे. 

 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यkolhapurकोल्हापूर