शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गडरक्षण हीच खरी शिवसेवा - शाहू छत्रपती; किल्ले भुदरगडवर ‘आपला मावळा’ तर्फे स्वच्छता मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:28 IST

खासदार नीलेश लंके यांचा साधेपणाचा धडा

गारगोटी : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केवळ तोंडी नको,तर त्यांच्या गडांचे रक्षण आणि संवर्धन ही आपली जबाबदारी आहे,” असा प्रभावी संदेश खासदार खासदार शाहू छत्रपती यांनी दिला.खासदार नीलेश लंके यांच्या ‘आपला मावळा’ संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या गडसंवर्धन व स्वच्छता मोहिमेचा आठवा टप्पा किल्ले भुदरगड येथे रविवारी हजारो मावळ्यांच्या सहभागात उत्साहात पार पडला. या मोहिमेचा शुभारंभ खासदार शाहू छत्रपती, आमदार जयंत पाटील व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते झाला.शाहू महाराज म्हणाले,“गडांवरील स्वच्छता, मंदिर दुरुस्ती, सूचना फलक बसविणे हे छोटे उपक्रम असले तरी अत्यंत प्रभावी आहेत. नीलेश लंके यांनी पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि सशक्त गड सोडून देण्याचे कार्य हाती घेतले आहे.त्यांचे प्रयत्न शिवरायांचे विचार जनमानसात रुजविणारे आहेत. ‘आपला मावळा’ ही संघटना भविष्यात लाखो तरुणांना एकत्र करून शिवकार्याच्या रणांगणात उतरलेली दिसेल, असा मला विश्वास आहे.“शिवनेरीपासून सुरू झालेली ही मोहीम धर्मवीर, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड पार करून आता भुदरगडवर पोहोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचा वारसा जतन करण्यासाठी हा उपक्रम आहे,” असे लंके यांनी सांगितले. गडसंवर्धनासाठी शासनाकडून विशेष निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.रविवारी सकाळी ‘आपला मावळा’चे टी-शर्ट परिधान केलेले हजारो युवक-युवती“जय शिवराय!”च्या घोषात फावडे, कुदळ, झाडू हातात घेऊन गडाकडे रवाना झाले.यावेळी आर. के. पवार, राहुल देसाई, सत्यजित जाधव, प्रतीक पाटील, सुदेश सापळे, संतोष मेंगाने, अनिल घाटगे, सुनील शिंत्रे, प्रकाश पाटील, रणधीर मोरे, निखिल निंबाळकर, के. के. भारतीय उपस्थित होते.लंके यांचा साधेपणाचा धडाखासदार लंके यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन हजारो मावळे या उपक्रमात सहभागी झाले. मात्र, त्यांनी कोणताही दिखावा न करता पुष्पनगर येथील शाळेत मुक्काम केला. पहाटे मावळ्यांसह जयघोषात गडाकडे प्रस्थान करणारा त्यांचा साधेपणा परिसरात चर्चेचा विषय ठरला.

English
हिंदी सारांश
Web Title : Protecting forts is true Shivseva: Shahu Chhatrapati; cleanliness drive at Bhudargad.

Web Summary : Shahu Chhatrapati emphasizes fort protection as true Shivseva. 'Aapla Mavla' organized a cleanliness drive at Bhudargad fort with thousands participating. Nilesh Lanke aims to preserve Shivaji Maharaj's legacy, securing funds for fort conservation.