शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

Kolhapur Politics: विधानसभेला एक झेंडा...आता दुसराच अजेंडा; आगामी निवडणुकीत पुन्हा एकमेकांविरोधात उभे ठाकणार

By पोपट केशव पवार | Updated: November 1, 2025 18:57 IST

ज्या पक्षाचे उपरणे आता गळ्यात टाकले आहे, त्याच पक्षाविरोधात निवडणुकीच्या रणधुमाळीत या आयाराम-गयारामांनी आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून दिली होती

पोपट पवारकोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पक्षाच्या प्रति असणारी निष्ठा गुंडाळून ठेवत काही दिवसांतच थेट सत्ताधारी पक्षासोबत घरोबा केला आहे. ज्या पक्षाचे उपरणे आता गळ्यात टाकले आहे, त्याच पक्षाविरोधात निवडणुकीच्या रणधुमाळीत या आयाराम-गयारामांनी आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून दिली होती. मात्र, इतके करूनही अंगाला गुलाल न लागल्याने या नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वळचण पकडली असल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे, विधानसभेला एका पक्षाचा झेंडा घेऊन ज्यांच्या विरोधात लढले त्याच नेत्यांबरोबर आता ते सत्ताधारी म्हणून मांडीला मांडी लावून बसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र हेच नेते पुन्हा एकमेकांविरोधात उभे ठाकणार असल्याने राजकीय पटलावरचे हे पाणी किती वळण घेणार याचीच उत्सुकता आहे.

कें. पीं.ची अशीही निष्ठाराधानगरी मतदारसंघातून उद्धवसेनेची मशाल घेऊन लढलेले माजी आमदार के. पी. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धुरळा खाली बसायच्या आतच सत्ताधारी अजित पवार गटात प्रवेश करून आपली पुढील दिशाही स्पष्ट केली. त्यामुळे अगदी एक-दोन महिन्यांपुरतीच त्यांनी उद्धवसेनेपुरती निष्ठा वाहिल्याचे दिसून आले. याच मतदारसंघातून अपक्ष रिंगणात उतरलेल्या ए. वाय. पाटील यांनी निवडणुकीनंतर सत्ताधारी अजित पवार गटाशी मेतकूट जुळवले आहे.राहुल यांनीही वाजवली घड्याळाची टिकटिककरवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लढलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. घड्याळ हातात बांधण्यासाठी त्यांनी भोगावती कारखान्याचे निमित्त पुढे केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील माजी आमदार पी. एन. पाटील यांची ओळख निष्ठेचे दुसरे नाव अशी राज्यभर होती. त्यांनी सहा विधानसभा निवडणुका लढल्या आणि चारवेळा पराभूत झाले. परंतु, तरीही एक लाख मतांचा गठ्ठा त्यांनी कधी हलू दिला नाही. संघर्ष करत राहिले, परंतु त्यांनी पक्षबदलाचा विचार कधी मनाला शिवू दिला नाही. याउलट व्यवहार राहुल पाटील यांच्याकडून झाला.मिणचेकरांचा उद्धवसेना व्हाया स्वाभिमानी ते शिंदेसेना प्रवासहातकणंगले विधानसभा मतदारसंघातून स्वभिमानीकडून उमेदवार असलेले माजी आमदार सुजित मिणचेकर यांनीही शिंदेसेनेचा धनुष्यबाण ताणला आहे. उद्धवसेना व्हाया स्वाभिमानी ते शिंदेसेना असा त्यांचा वर्षभरातला प्रवास राहिला आहे. उद्धवसेनेमुळेच त्यांच्या अंगावर दोनवेळा आमदारकीचा गुलाल पडला. परंतु, सत्तेच्या मोहात ते त्याला विसरले. शिरोळ विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानीच्या तिकिटावर रणांगणात उतरलेले माजी आमदार उल्हास पाटील सध्या राजकीय विजनवासात आहेत. त्यांचाही प्रवास उद्धवसेना ते स्वभिमानी असाच राहिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Politics: Leaders switch allegiance, prepare to clash again in polls.

Web Summary : Post-election in Kolhapur, many leaders switched parties to align with the ruling coalition. Despite past rivalries, they now share power. These leaders are expected to contest against each other in upcoming local elections, creating political uncertainty.